घरताज्या घडामोडीपुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; सीएनजीच्या दरात वाढ, नागरिक त्रस्त

पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला; सीएनजीच्या दरात वाढ, नागरिक त्रस्त

Subscribe

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य पुणेकरांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्य पुणेकरांना आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशातच सीएनजीच्या दरात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांचा रिक्षाप्रवास महागला आहे. इंधनाच्या दरवाढीमुळे आता रिक्षा भाडेवाड करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यात सीएनजी, इंधन दरवाढीमुळे रिक्षा भाड्यात २ रूपयांनी वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे पुणेकरांना आता रिक्षाने प्रवास करण्यासाठी खिशाला कात्री लावावी लागणार आहे. (due to cng rates increase autorickshaw fare hike in pune)

नवीन दरवाढीनुसार, पहिल्या १.५ किमीसाठी २१ रूपयेऐवजी आता २३ रूपये मोजावे लागणार आहे. तर त्यापुढील प्रत्येक किमीसाठी १४ रूपयांऐवजी १५ रूपये मोजावे लागणार आहे. याबाबत पुणे आरटीओचे अधिकारी अजय शिंदे यांनी ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

रिक्षा भाडेवाढीसाठी आप रिक्षा संघटनेने आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर पुणे आरटीओने हा निर्णय घेतला आहे. मात्र, एकिकडे पेट्रोल-डिझेलच्या सततच्या वाढत्या किमतींनी सर्वसामान्यांचे आधीच कंबरडे मोडले आहे. जीवनावश्यक गोष्टींच्या दरांनी सामांन्यांचे बजेट बिघडले आहे. तर दुसरीकडे रिक्षाप्रवास ही महागला असल्याने सर्वसामन्यांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

इंधनाचे दर वाढल्याने सर्वच वस्तूंचे दर वाढत आहेत. शिवाय, जीएसटीही केंद्राकडून वाढवण्यात आला आहे. २८-२९ जून रोजी झालेल्या जीएसटी काउंसिलच्या (GST Council) बैठकीमध्ये जीएसटी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. तसेच, १८ जुलैपासून याची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

- Advertisement -

टेट्रा पॅक असलेले आणि लेबल केलेले (फ्रोझन वगळता) मासे, दही, पनीर, लस्सी, मध, सुका मखाना, कोरडे सोयाबीन, मटार, गहू आणि इतर तृणधान्ये आणि तांदूळ यांसारख्या उत्पादनांवर आता 5% जीएसटी लागू होईल. आत्तापर्यंत या वस्तूंना जीएसटीमधून सूट देण्यात आली होती.


हेही वाचा – राज्यात २४ तासांत ७८५ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, तर ६ जणांचा मृत्यू

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -