घरदेश-विदेशभ्रष्टाचाराचे समर्थन नाही; पार्थ चॅटर्जींच्या अटेकवर ममतांची पहिली प्रतिक्रिया

भ्रष्टाचाराचे समर्थन नाही; पार्थ चॅटर्जींच्या अटेकवर ममतांची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

शिक्षक भरती घोटाळ्यात पश्चिम बंगाल सरकारचे मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्या अटकेनंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. या प्रकरणावर आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. मी भष्ट्राचाराच्या कोणत्याही प्रकारच्या चुकीच्या गोष्टींचे समर्थन करत नाही, जर कोणी दोषी आढळला तर त्याचा सिक्षा झाली पाहिजे. मात्र माझ्याविरोधात चालवल्या जाणाऱ्या दुर्भावनापूर्ण मोहिमेचा मी निषेध करते. अशी प्रतिक्रिया ममता बॅनर्जी यांनी दिली आहे. ईडीने पार्थ चॅटर्जींना शिक्षक भरती घोटाळ्यातील कथित मनी लाँड्रिंग प्रकरणी अटक केली, या यावेळी पार्थ यांच्या निकटवर्तीय अर्पिता यांच्याकडून ईडीने जवळपास 20 कोटींची रोकड आणि अनेक मोबाईल जप्त केले. यानंतर अर्पिता देखील बेड्या ठोकण्यात आल्या.

पार्थ चॅटर्जींना वैद्यकीय तपासणीसाठी एम्स भुवनेश्वरमध्ये घेऊन गेल्याने ममता म्हणाल्या की, मला लाज वाटते, ओडिशाला एम्समध्ये नेले, आमच्याकडे नंबर वन मेडिकल कॉलेज आहे, खासगीत खूप चांगले कॉलेज आहेत, बंगालमध्ये काही नाही का? तुमचा हेतू काय आहे ते खूप काही सांगून जात आहे. महाराष्ट्र जे केले ते मग झारखंडमध्ये करणार, मग छत्तीसगडमध्ये करणार, मग बंगाल करणार असा डाव असल्याचा आरोप ममतांनी केला आहे.

- Advertisement -

या प्रकरणावर ममता बॅनर्जी यांनी त्यांच्या विरोधात सुरू केलेल्या “दुर्भावनापूर्ण मोहिमेबद्दल” विरोधकांवर टीका केली. त्या म्हणाल्या की, आमचा न्यायव्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. एक कालमर्यादा असावी, ज्यामध्ये सत्य आणि न्यायालयाचा निर्णय बाहेर यावा. कोणी दोषी आढळल्यास त्याला शिक्षा झाली पाहिजे. पक्षही कारवाई करेल. दरम्यान भाजपने एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये बॅनर्जी अर्पिता मुखर्जी यांच्याशी बोलताना दिसत आहेत, ज्यांच्याच घरातून 22 कोटी रुपयांची रोकड सापडली आहे. मात्र तृणमूल काँग्रेसचा या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचे मुख्यमंत्री बॅनर्जींनी जाहीर केले आहे.

महाराष्ट्र तुमचा मुकाबला करु शकला नाही, पण…

दरम्यान महाराष्ट्र तुमचा मुकाबला करु शकला नाही, पण बंगाल सरकारपण पाडण्याची भाषा केली जातेय. परंतु बंगालमध्ये शेरनी बसली आहे तिच्यासोबत आधी तुम्हाल मुकाबला करावा लागेल. ही शेरनी कुणाला घाबरत नाही, ती जर आज काही बोलत नाही याचा अर्थ ती घाबरली असं कुणी समजू नका, अशा रोखठोक इशाराही मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला दिला आहे.

- Advertisement -

पक्ष फोडीचे कारस्थान अजिबात खपवून घेणार नाही

मी अन्याय कधीच सहन करणार नाही, पण सत्याचा विचार केला पाहिजे. खरचं जर कुणी दोषी असेल तर त्याला आजीवन कारावासाची शिक्षा करा, पण ज्याप्रकारे एका महिलेच्या घरात पैशांचे गठ्ठे आढळून आले त्यावरून पक्षावर चिखल उडण्याचे काम सुरु आहे ते अत्यंत चुकीचे आहे. केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करा, पण यातून पक्ष फोडीचे कारस्थान मी अजिबात खपवून घेणार नाही. संबंधित महिलेचा आणि पक्षाचा, सरकारचा कोणताही संबंध नाही. ज्यापद्धतीने बलात्कार प्रकरणी फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी होते. त्याचपद्धतीनं याही प्रकरणाची तीन महिन्यांच्या आत सुनावणी झाली पाहिजे, अशी मागणी ममता बॅनर्जी यांनी व्यक्त केली.

दुखापत झालेली वाघीण आणखी भयंकर असते

कोणताही संबंध नसलेल्या प्रकरणावरुन जर अपमान करणार असाल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, दुखापत झालेली वाघीण आणखी भयंकर असते. 2021 च्या निवडणुकीत जे आहे ते दाखवून दिसे, जर आम्हाला कुणासमोर झुकण्याची वेळ आली तर आम्ही फक्त राज्यातील जनतेसमोर झुकू, कुणी मीडिया ट्रायल करणार असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा, आगीशी खेळू नका. प्रत्युत्तर कसं द्यायचं ते मला चांगलंच माहित आहे. असा धमकी वजा इशारा ममता बॅनर्जींनी भाजपला दिला आहे.


राज्यातील 9 मनपा निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदारयाद्या 13 ऑगस्टला होणार जाहीर

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -