Eco friendly bappa Competition
घर क्राइम शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षेत मुंबईचा क्रमांक चिंताजनक; तुमचे शहर कोणत्या...

शिंदे -फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षेत मुंबईचा क्रमांक चिंताजनक; तुमचे शहर कोणत्या क्रमांकावर?

Subscribe

राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे.

मुंबई : गणेश चतुर्थीच्या पावन पर्वावर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महिलांना समसमान अधिकार मिळावा या उद्देशाने महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. या घोषणेनंतर सर्वत्र आनंद व्यक्त केला जात असताना दुसरीकडे मात्र, महाराष्ट्र पोलिसांच्या आकडेवारीवरुन महिला असुरक्षिततेचे भयान वास्तव समोर आले आहे. ते म्हणजे महिला असुरक्षिततेत मुंबई अव्वल स्थानी असून, दुसऱ्या क्रमांकावर पुणे तर त्यानंतर उपराजधानी नागपूरचा नंबर लागत आहे. तेव्हा पुन्हा एकदा महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.(During the Shinde Fadnavis government Mumbais rank in womens safety is alarming What number is your city)

राज्यात महिलांवर बलात्कार, विनयभंग, अपहरण आणि कौटुंबीक हिंसाचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पोलिसांच्या आकडेवारीतून समोर आले आहे. त्यातील गंभीर बाब म्हणजे महिला विनयभंग आणि अश्लील वर्तनाचे सर्वाधिक गुन्हे मुंबईत नोंदवले गेले आहेत. मुंबईनंतर पुणे आणि नागपूर शहरात अधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. या शहरात महिला सुरक्षेसाठी काय प्रयत्न केले जातात हा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे.

विनयभंगाच्या घटनेत चारपटीने वाढ

- Advertisement -

मुंबई म्हणजे मायानगरी. गावखेड्यातील लोक येथे रोजगारासाठी येतात. रोज येणाऱ्या या लोढ्यांमुळे मुंबईचा विस्तार वाढला आहे. तेव्हा जेथे लोकसंख्या जास्त तेथे गुन्हेगारी जन्म घेतेच. तेव्हा एकट्या मुंबईत मागील आठ महिन्यांत विनयभंगाच्या तब्बल 1254 घटनांची नोंद झाली आहे. ही नोंद राज्यातील अन्य शहरांच्या तुलनेत तब्बल चारपटीने जास्त असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

हेही वाचा : सर्व पक्ष महिला आरक्षणाच्या विधेयकाला पाठिंबा देतील; फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास

ही आकडेवारी तुमचे डोके चक्रावून टाकू शकते

- Advertisement -

मागील एक ते दीड वर्षापूर्वी सत्तेत आलेल्या शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात महिला सुरक्षेच्या प्रश्नासह कायदा आणि सुव्यवस्था ढासळत चालली असल्याचा आरोप विरोधकांकडून सातत्याने केल्या जात आहे. याचदरम्यान आज संसदेत मोदींनी महिला आरक्षण विधेयकाची घोषणा केली. एकंदरीत या घडामोडीनंतर महाराष्ट्रातील महिलांवरील अत्याचाराच्या घटानांचा आढावा घेतला असता मागील आठ महिन्यांत
549 लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांची नोंद मुंबई पोलिसांत करण्यात आली आहे. तर 300 अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आल्याचीही नोंद आहे.तसेच कौटुंबीक हिंसाचार, हुंडाबळीसारख्या गुन्ह्याच्या घटनांमध्येही दुप्पट वाढ झाली आहे.

हेही वाचा : …तेव्हा घोलपांची निष्ठा कुठे होती?; छगन भुजबळांचा घणाघात

सांस्कृतिक राजधानीसुद्धा कुठे राहली सुरक्षित

राज्याची राजधानी मुंबई नंतर राज्यातील दुसरे महानगर म्हणजे पुणे. पुणे म्हणजे तिथे काय उणे असे सहज म्हटले जाते. पण ही म्हण आता खरी ठरू लागली आहे. कारण, पुण्यात काहीच कमी नसताना आता तिथे गुन्हेगारीही कमी नसल्याचे चित्र आहे. पुण्यात महिलांवर सर्वाधिक लैंगिक अत्याचाराच्या घटना उघडकीस आल्या आहेत. गेल्या आठ महिन्यांत पुण्यात विनयभंगाच्या 364 घटनांची नोंद करण्यात आली आहे तर 124 लैंगिक अत्याचाराचाही त्यात समावेश आहे. तर उपराजधानी नागपूरमध्ये मागील आठ महिन्यांत 304 महिलांचे विनयभंग तर 165 महिलांवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची नोंद आहे. तेव्हा राज्यातील महानगरात महिला असुरक्षित असल्याचे यावरून दिसून येत आहे.

- Advertisment -