घरक्राइमवर्षभरात ग्रामीण पोलिसांनी केले ७ हजार अवैध धंदे उद्ध्वस्त  

वर्षभरात ग्रामीण पोलिसांनी केले ७ हजार अवैध धंदे उद्ध्वस्त  

Subscribe

वर्षभरात ९ हजार ३८७ जणांवर कारवाई, 76 खूनापैकी ७५ गुन्ह्यांची उकल, ३५ देशी कट्टे, ६८ तलवारी, १७ कोयते, २३ चाकू जप्त 

पोलीस अधीक्षक शहाजी उमाप पॅटर्नमुळे जिल्हा व राज्य सीमा पार करून होणारी गुटख्याची चोरटी वाहतूक नियंत्रणात आली आहे. त्यामुळे परराज्यात अवैध गुटख्याची तस्करी करणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. ग्रामीण पोलिसांनी  अवैध व्यवसाय विरोधी अभियान  राबवत वर्षभरात ७ हजार कारवाया केल्या असून, तब्बल ३० कोटींचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.
१ जानेवारी ते ३१ डिसेंबर २०२३ या कालावधीत नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायाविरोधात तब्बल ६ हजार ९३९ छापे टाकण्यात आले. पोलिसांनी तब्बल ९ हजार ३८७ जणांविरुद्ध कारवाया करत २९ कोटी १३ लाख ६९ हजार ७९७ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. हस्तगत केलेल्या मुद्देमालात ३५ देशी बनावटीचे कट्टे, ६८ तलवारी, १७ कोयते व २३ चाकू हस्तगत करण्यात आले.
२०२३ मध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी अवैध व्यवसायांची माहिती जनतेतून मिळावी, यासाठी ६२६२ २५ ६३६३ हेल्पलाईन सुरू करण्यात आली. त्यास नागरिकांनी प्रतिसाद देत अवैध व्यवसायांची माहिती पोलिसांना दिली.  जिल्ह्यात वेगवेगळया भागात चालणार्‍या अवैध व्यवसायांचे उच्चाटन करण्याकामी नाशिक ग्रामीण पोलीसांनी आठ विशेष पथकांची निर्मिती केली. पथके जिल्ह्यातील नाशिक ग्रामीण, निफाड, कळवण, पेठ, मनमाड, मालेगाव शहर, मालेगाव कॅम्प व मालेगाव ग्रामीण अशा आठ उपविभागात सोडण्यात आली. पथकांनी त्यांना नेमून दिलेल्या भागातील अवैध व्यवसायांची माहिती काढून तसेच हेल्पलाईनवर प्राप्त झालेल्या माहितीवर कारवाई केली.

प्रकरणांच्या कालबद्ध निर्गतीवर भर

नागरिकांनी मांडलेल्या तक्रारीची त्वरीत दखल घेण्याच्या दृष्टीकोनातून व त्यांची विशिष्ट कालमर्यादेत निर्गती करण्याच्या दृष्टीकोनातून नाशिक ग्रामीण पोलिसांनी प्रकरणांच्या कालबद्ध निर्गतीवर भर दिला. यामुळे शेतकर्‍यांना जमीन मोजणीसाठी लागणारे बंदोबस्त, चारित्र पडताळणी, पासपोर्ट, अर्ज चौकशी, पेट्रोल पंप, शस्त्र परवाने इत्यादी प्रकरणे मुदतीत निकाली काढून सर्व सामान्य जनतेस दिलासा देण्याचा प्रामाणिक प्रयत्न नाशिक ग्रामीण पोलिसांनी केला आहे.
९३९ गुटखा विक्रेते तुरुंगात
तरुणाईस गुटख्याच्या विळख्यापासून वाचविण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी सामाजिक बांधिलकी जोपासत गुटख्याविरुद्ध सलग पाच महिने विशेष अभियान राबवून जिल्ह्यातील गुटख्याच्या समूळ उच्चाटनासाठी सर्वोच्च पातळीवर प्रयत्न केले. या प्रकरणात कलम ३२८ भादवि खाली गुन्हे नोंद झाल्याने एकूण ९३९ गुटखा विक्रेत्यांना जेलमध्ये जावे लागले.

बळीराजा हेल्पलाईन

नाशिक जिल्हा हा शेतीप्रधान जिल्हा आहे. या भागातील द्राक्ष, डाळिंब, कांदा, टोमॅटो व भाजीपाला प्रसिद्ध असल्याने बाहेरील व्यापा-यांनी शेतकर्‍यांचा माल खरेदी करून त्यांना पैसे न देता त्यांची फसवणूक केल्याच्या अनेक तक्रारी पोलीस मुख्यालयाकडे प्राप्त होत होत्या. ही बाब लक्षात घेऊन नाशिक ग्रामीण पोलिसांनी जिल्ह्यातील शेतकर्‍यांना तक्रर करण्यासाठी ६२६२ ७६ ६३६३ हेल्पलाईन सुरू केली. या हेल्पलाईनवर १५७ शेतकर्‍यांनी गार्‍हाणी मांडली. ६९ शेतकर्‍यांना ५५ लाख ७१ हजार ११९ रुपये फसवणुकीची रक्कम परत मिळवून देण्यासाठी नाशिक ग्रामीण पोलिसांनी मोलाची भूमिका बजावली.

खून, दरोड्याच्या गुन्ह्यांचा सखोल तपास

जिल्ह्यातील खून व दरोड्याचे गुन्ह्यांना नाशिक ग्रामीण पोलीसांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. सन २०२३ मध्ये जिल्ह्यात एकूण ७६ खूनाचे गुन्हे नोंद झाले. यातील ७५ गुन्हे उघडकीस आणण्यात ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे. २०२३ मध्ये डिसेंबरच्या चौथ्या आठवड्यात त्रंबकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ३२ वर्षीय तरुणाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आला होता. मयताची ओळख पटवण्यात यश आले असून, स्थानिक गुन्हे शाखा व त्रंबकेश्वर पोलीस ठाणे गुन्ह्याची उकल करत आहेत. त्याचप्रमाणे, २०२३ मध्ये जिल्ह्यात दरोड्याचे १६ गुन्हे घडले असून, हे सर्व १६ गुन्हे उघडकीस आणण्यात नाशिक ग्रामीण पोलिसांना यश मिळाले आहे.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -