घरमहाराष्ट्रमुंबईसह ठाण्यातील ठिकाणांवर ईडीची छापेमारी; नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

मुंबईसह ठाण्यातील ठिकाणांवर ईडीची छापेमारी; नवाब मलिकांच्या अडचणी वाढण्याची शक्यता

Subscribe

दाऊद इब्राहिमच्या गँगशी संबंधित व्यक्तीकडून नवाब मलिकांनी भूखंड खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर हा भूखंड गोवावाला कंपाऊंडच्या बाजूलाच आहे. त्यामुळे त्यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठीच ईडीनं छापेमारी केल्याचं बोललं जातंय.

मुंबईः ईडीच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा मुंबईसह ठाण्यात छापेमारी केलीय. मुंबईतील कुर्ला परिसरातील गोवावाला कंपाऊंडमध्ये ईडीच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकलीय. विशेष म्हणजे गोवावाला कंपाऊंड भूखंडाच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांना अटक करण्यात आली असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलंय.

कुर्ला परिसरातील गोवावाला कंपाऊंडमध्ये ईडीच्या 8 ते 9 अधिकाऱ्यांनी आज सकाळीच धाड टाकलीय. विशेष म्हणजे या पथकात एका महिलेचाही समावेश असून, सीआरपीएफ जवानांचाही मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. गोवावाला कंपाऊंडमधील एका वयोवृद्ध व्यक्तीकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपास केलाय. त्यांच्याकडून बरीच कागदपत्र आणि माहिती गोळा करण्यात आलीय. नवाब मलिक प्रकरणाशी संबंधित माहिती मिळवण्यासाठी ईडीनं ही छापेमारी टाकल्याचंही सांगितलं जात आहे.

- Advertisement -

दाऊद इब्राहिमच्या गँगशी संबंधित व्यक्तीकडून नवाब मलिकांनी भूखंड खरेदी केल्याचं सांगितलं जात आहे. खरं तर हा भूखंड गोवावाला कंपाऊंडच्या बाजूलाच आहे. त्यामुळे त्यासंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठीच ईडीनं छापेमारी केल्याचं बोललं जातंय. तसेच या धाडीमुळे नवाब मलिक यांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे. मोठे मोठे बिल्डर्स आयकर विभागाच्या रडारवर असल्याचीही माहिती मिळालीय. हिरानंदानी ग्रुपवरच्या काही ठिकाणांवरही धाडी टाकण्यात आल्यात.

- Advertisement -

मलिकांना 4 एप्रिलपर्यंत न्यायालयीन कोठडी

दुसरीकडे अंडरवर्ल्ड कनेक्शन आणि मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालया (ईडी)ने अटक केलेले राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या न्यायालयीन कोठडीत विशेष पीएमएलए कोर्टाने 4 एप्रिलपर्यंत वाढ केलीय. त्यामुळे मलिक यांचा आर्थर रोड तुरुंगातील मुक्काम वाढला आहे. दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरच्या ताब्यातील ३०० कोटी रुपयांचे मूल्य असलेली जमीन केवळ ५५ लाखांना खरेदी केल्याचा नवाब मलिक यांच्यावर आरोप आहे. हा सगळा बेनामी मालमत्तेचा व्यवहार मलिक यांनी १९९३ बॉम्बस्फोटातील आरोपींसोबत मिळून केला आणि या पैशांचा वापर मनी लाँड्रिंग तसेच टेरर फंडिंगसाठी झाल्याचाही मलिक यांच्यावर आरोप आहे. दाऊद टोळीकडून अनेकांना धमकावून वादातील मालमत्ता बळकावण्यात आल्या होत्या. त्यातील एक पीडित मुनीरा प्लंबर यांची कुर्ला येथे तीन एकर जमीन होती. याच जमिनीचा बेनामी व्यवहार केल्याचे ईडीचे म्हणणे आहे.

घरचे जेवण आणि अंथरूण

न्यायालयीन कोठडीत वाढ करताना नवाब मलिकांना तुरुंगात बेड, अंथरूण आणि खुर्ची देण्यास कोर्टाने परवानगी दिली आहे. मलिकांना हायपर टेन्शन आणि मधुमेहाचा त्रास असल्याने कमी मिठाचे घरचे जेवण देण्याची विनंतीही मान्य करण्यात आली आहे. वैद्यकीय अहवाल आल्यावर पुढील निर्णय घेऊ, असेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.


हेही वाचाः LPG Price Hike: गृहिणींचे बजेट कोलमडणार, घरगुती गॅस सिलिंडर ५० रुपयांनी महागला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -