घरमहाराष्ट्रElectoral Bonds : पक्षदेणगीवरून प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले - सर्वाधिक...

Electoral Bonds : पक्षदेणगीवरून प्रवीण दरेकरांचा संजय राऊतांवर पलटवार, म्हणाले – सर्वाधिक निधी…

Subscribe

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राज्यात इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांवरून राजकारण रंगले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ट्वीट करत भाजपावर निशाणा साधला होता. तर, भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी त्याला प्रत्युत्तर दिले आहे.

हेही वाचा – Lok Sabha 2024 : निवडणूक आयोगाने भाजपावरच कडक नजर ठेवावी, ठाकरे गटाचा टोला

- Advertisement -

ऑनलाइन लॉटरीसंदर्भात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी 28 फेब्रुवारी 2024 रोजी उपमुख्यमंत्री तथा, गृहमंत्री फडणवीस यांना पत्र पाठवले होतेऑनलाइन लॉटरी म्हणजे एकप्रकारे हा जुगार असून तरुणाई त्याच्या विळख्यात अडकत आहे. ऑनलाइन जुगाराच्या विरोधात कोणतीही कारवाई केली जाऊ नये, यासाठी महिन्याला साधारण 100 कोटींचा हप्ता वित्त विभाग, गृहविभागापर्यंत म्हणजे सरकारपर्यंत पोहोचवला जातो. वित्त विभाग आणि गृहविभागाशी याबाबत मध्यस्थी करण्याचे काम गुजरात निवासी मंगलभाई नावाचा दलाल करतो, असा दावा करत या ऑनलाइन लॉटरीवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

- Advertisement -

तथापि, आज, सोमवारी ट्वीट करत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला. या जुगारी कंपनीने (Future gaming.. Martin lottery agency Ltd.) 450 कोटी रुपयांची देणगी भाजपाला दिली आहे. त्यामुळे गृहमंत्री फडणवीस कारवाई करतील कशी? असा खोचक प्रश्न करत, भाजपाचा उल्लेख संजय राऊत यांनी ‘भारतीय जुगारी पार्टी’ असा केला आहे.

आता संजय राऊत यांच्या ट्वीटला आमदार प्रवीण दरेकर यांनी ट्विटरवरूनच उत्तर दिले आहे. फ्युचर गेमिंगने सर्वाधिक 37 टक्के म्हणजे 509 कोटी रुपये संजय राऊत यांच्या इंडी आघाडीतील घटक पक्ष असलेल्या द्रमुकला दिले आहेत. हे खुदद् द्रमुकने सुद्धा जाहीर केले असल्याचा दावा दरेकर यांनी केला आहे.

हेही वाचा – Sanjay Raut : लोहा लोहे को काटता है…, फडणवीसांच्या वक्तव्यावर राऊतांचे आव्हान

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -