घरमहाराष्ट्रफराळ करायला वेळ नाही? या ठिकाणी मिळेल मुंबईतला बेस्ट फराळ

फराळ करायला वेळ नाही? या ठिकाणी मिळेल मुंबईतला बेस्ट फराळ

Subscribe

दिवाळीत फराळ करायला वेळ नसला तरीही फराळाची मज्जा घ्या. बाजारात तयार फराळाचा पर्याय उपलब्ध आहे

भारतीय संस्कृतीत सणांना फार महत्तव दिलं जातं. हे सण अगदी थाटामाटात आणि उत्साहाने साजरे केले जातात. दिवाळी, होळी, नवरात्र, गणेशोत्सव, गुढीपाडवा असे अनेक सण साजरे केले जातात. प्रत्येकालाच हे सण साजरे करायचे असतात पण आजकालच्या धावपळीच्या जीवनात सण साजरा करायला फारच कमी वेळ मिळतो. दिवाळीचा सण थोड्याच दिवसांवर येऊन ठेपलाय आणि दिवाळी म्हंटलं तर सगळ्यात आधी डोळ्यासमोर येतं ते म्हणजे फराळ. पण जर तुम्हाला फराळ करायला वेळ नसेल, तर काळजी करु नका. मुंबईतही तुम्हाला उत्तम तयार फराळ मिळतोय, त्याचा लाभ घ्या..

मुंबईतील दादर परिसरात शिवाजी पार्क शेजारी तयार फराळ मिळतोय. शिल्पा पोवार या गृहिणी गेल्या आठ वर्षांपासून तयार फराळ विक्रीचा व्यवसाय करत आहेत. महिला बचत गटाच्या माध्यमातून त्या हा व्यवसाय करत आहेत. अगदी लाडू, चकली, करंजी पासून ते अनारसे, चिवडा, शंकरपाळ्या असं सगळेच फराळाचे पदार्थ त्यांच्या स्टॉलवर उपलब्ध आहेत. पारंपारीक फराळासोबतच डायटवर असलेल्या लोकांसाठी देखील विविध पर्याय उपलब्ध आहेत. बेक केलेल्या करंज्या आणि चकल्या देखील विकत मिळतात.

- Advertisement -
शिल्पा पोवारयांचा दादर येथील स्टॉल
शिल्पा पोवारयांचा दादर येथील स्टॉल

काही वर्षांपूर्वी पासून तयार फराळाचा ट्रेंड सूरू झाला आहे. लोकांनी देखील त्याला चांगलाच प्रतिसाद दिलेला आहे. अनेक लोक सध्या तयार फराळाचा पर्याय निवडत आहेत. पोवार यांचा फराळ चविष्ट तर असतोच पण त्यासोबत आरोग्यदायी देखील आहे, असे त्या सांगतात. गृहिणींसाठी हा पर्याय उत्तम ठरलेला आहेच, पण अनेक लोकांना या तयार फराळा पासून रोजगार देखील मिळत आहे. अनेक महिला बचत गट या तयार फराळ बनवण्याच्या व्यवसायात सध्या उतरले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -