घरमहाराष्ट्रअटलाव डेबेबे ठरला पुणे मॅरेथॉनचा मानकरी

अटलाव डेबेबे ठरला पुणे मॅरेथॉनचा मानकरी

Subscribe

३३ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेत झिके अटलाव डेबेबे यांनी पुणे मॅरेथॉनचे विजेते पद पटकावले असून महिलांच्या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने विजेतेपद पटकावले आहे.

३३ वी पुणे आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन स्पर्धेचा मानकरी झिके अटलाव डेबेबे हा ठरला आहे. इथोपियाचा धावपटू अटलाव डेबेड हा या स्पर्धेचा विजेता ठरला आहे. त्याने ४२ किलो मीटरची मुख्य फुल मॅरेथॉन स्पर्धा जिंकत बाजी मारली आहे. तर महिलांची ४२. १९५ किलोमीटर अंतराची शर्यत केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने जिंकली आहे. या स्पर्धेमध्ये एकूण १५ हजार स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेमध्ये १०२ परदेशी स्पर्धक सहभागी झाले होते. विविध अंतरासाठी आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मुख्य मॅरेऑन ४२ किमी. , हाफ मॅरेथॉन २१ किमी., १० किमी, ५ किमी आणि व्हीलचेअर अशा विविध अंतरगटांचा या स्पर्धेत समावेश करण्यात आला होता.


वाचा – तरीही मॅरेथॉनला खड्ड्यांचा सामना करावा लागलाच

- Advertisement -

अशी झाली स्पर्धेला सुरुवात

पुण्यातील सारसबागेजवळील सणस क्रीडागंणापासून या मॅरेथॉनला पहाटे चार वाजता सुरुवात झाली. या स्पर्धेला माजी खासदार सुरेश कलमाडी यांच्या हस्ते या मॅरेऑनला सुरुवात झाली. या स्पर्धेला राज्यसभा खासदार वंदना चव्हाण, परालम्पिकमध्ये पहिले सुवर्णपदक जिकणारे पद्मश्री मुरलीकांत पेटकर, मिलिटरी इंटेलिजन्स स्कुलचे कमांडंट लेफ्टनंट जनरल आर. के. बन्सीवाला उपस्थित होते.


वाचा – ठाण्यात आज महापौर वर्षा मॅरेथॉन 21 हजार स्पर्धकांची नोंदणी!

- Advertisement -

पुरुषांची मॅरेथॉन

पुरुषांच्या मॅरेथॉनमध्ये झिके अटवाल डेबेबेने दोन तास १७ मिनिटे आणि १७ सेकंद वेळ नोंदविली आहे. तर इथिओपियाच्या गतविजेत्या बेशा गेटाचेव याला यावेळी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले असून बेशाने २ तास १८ मिनिटे आणि ७ सेकंद वेळ नोंदविली आहे. बेकेले अबेबा असेफा तिसऱ्या क्रमांकावर राहिला आहे. त्याने २ तास १८ मिनिटे ३८ सेकंद वेळ नोंदविली आहे.


वाचा – मुंबई मॅरेथॉन 2019 साठीच्या नोंदणीला सुरुवात


महिलांची मॅरेथॉन

महिलांच्या मॅरेथॉनमध्ये केनियाच्या पास्कालिया चेप्कोगेइने २ तास ५० मिनिटे २७ सेकंद वेळ नोंदवीत विजेतेपद पटकावले असून त्यापाठोपाठ इथिओपियाच्या बेलेव असर मेकोनेनने २ तास ५२ मिनिटे ३० सेकंद वेळ नोंदवीत दुसरा क्रमांक मिळविला आहे. त्याचप्रमाणे इथिओपियाचीच फेकेडे सिमेन तिलाहूनने तिसरा क्रमांक मिळविला आहे.


वाचा – मुंबई मॅरेथॉनला गोल्ड लेबल चा दर्जा


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -