घरमनोरंजनरितेश - जिनेलियाचं धमाल गाणं; 'धुवून टाक...'!

रितेश – जिनेलियाचं धमाल गाणं; ‘धुवून टाक…’!

Subscribe

अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी चित्रपट 'माऊली' एकएक नवनवीन पदर आता उलगडू लागले आहेत. होळीच्या थिमवर 'धुवून टाक...', हे गाणं रितेशने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल असून यामध्ये त्याची रिअल लाईफ वाईफ जिनेलियासुद्धा दिसत आहे.

अभिनेता रितेश देशमुख याच्या आगामी चित्रपट ‘माऊली’ एकएक नवनवीन पदर आता उलगडू लागले आहेत. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर आला होता. यामध्ये रितेशचा ‘लयभारी’ आणि ‘टेरर’ अवतार प्रेक्षकांनी पाहिला. तर आज त्याने चित्रपटातील दुसरं गाणं प्रेक्षकांच्या भेटीला आणल आहे. होळीच्या निमित्ताने ‘धुवून टाक…’, हे गाणं रितेशने त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केल असून यामध्ये त्याची रिअल लाईफ वाईफ जिनेलियासुद्धा दिसत आहे. विशेष म्हणजे हे संपूर्ण गाणं या दोघांवरच चित्रीत झालं आहे. पांढऱ्या साडीतील जिनेलियाचा मराठमोळा अंदाज पुन्हा एकदा या गाण्यातून पाहायला मिळत आहे. अवघ्या चार वर्षानंतर रितेश आणि जिनेलियाची जोडी मोठ्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. ‘होळीचा सण म्हटलं की ती आलीच…’, या डायलॉगने माऊली तिचं स्वागत करतो. ‘माऊली’ ही चित्रपटा १४ डिसेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वाचा : लयभारी म्हणत रितेशच्या ‘माऊली’चं पोस्टर रिलीज

- Advertisement -

वाचा : डिसेंबरमध्ये होणार माऊलीचे दर्शन

- Advertisement -

‘लय भारी’मध्ये होळीचं गाणं

चार वर्षांपूर्वी रितेश देशमुखचा पहिला मराठी चित्रपट लय भारी प्रदर्शित झाला होता. यामधील आला होळीचा सण लय भारी… हे गाणं चांगलच गाजलं होतं. या गाण्यात चित्रपटातील अभिनेत्री राधिका आपटे होती. तर काही ओळींवर जिनेलिया थिरकली होती. मात्र होळीचं नवीन गाणं संपूर्णपणे रितेश-जिनेलियावर चित्रीत झालं आहे. या चित्रपटातील अभिनेत्री सयामी खैर गाण्यामध्ये कुठेही दिसत नाही. होळीची ही दोनही गाणी अजय-अतुल यांनी संगीतबद्ध केली असून आवाजही त्यांचाच आहे.

वाचा : दुष्काळ जाऊ दे, आरक्षण टिकू दे – चंद्रकांतदादांचे विठ्ठलाकडे साकडे

वाचा : कार्तिकी वारीनिमित्त पंढरपूर परिसरातील वाहतुकीत बदल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -