घरदेश-विदेशदिल्लीत हवाला रॅकेटचे २५ कोटी जप्त

दिल्लीत हवाला रॅकेटचे २५ कोटी जप्त

Subscribe

राजधानी दिल्लीतून हवाला रॅकेटचे २५ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. ईडीनं ही कारवाई केली आहे.

राजधानी दिल्लीमध्ये हवाला रॅकेटचे २५ कोटी रूपये जप्त करण्यात आले आहेत. अंमलबजावणी संचलनालयाने ही कारवाई केली आहे. जवळपास १०० लॉकर्समधून ही रक्कम जप्त करण्यात आली आहे. रविवारी अर्थात आज चांदणी चौक परिसरातून ही कारवाई करण्यात आली आहे. एएनआय या वृत्त संस्थेनं याबाबतचं वृत्त दिलं आहे. हवाला रॅकेट चालवणारे खासगी लॉकर्सचा वापर करत असल्याची माहिती मिळाली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. जप्त करण्यात आलेली रोकड ही मोठं मोठे व्यापार करणाऱ्यांची आहे. यामध्ये तंबाखू व्यापारी, सुक्या मेव्याचे व्यापारी आणि केमिकल व्यापारी यांचा सहभाग असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ईडी अर्थात अंमलबजावणी संचलनालयाने केलेली या वर्षातील ही तिसरी कारवाई आहे. हवाला रॅकेटच्या संशयावरून सध्या कारवाई सुरू करण्यात आली आहे. यामध्ये मुंबई – दिल्ली – दुबई असं कनेक्शन आहे. मुंबई – दिल्ली – दुबई या हवाला रॅकेटमध्ये आत्तापर्यंत २९ लाख रूपये जप्त करण्यात आले आहेत. यापूर्वी जानेवारीमध्ये देखील हवाला रॅकेटचे जवळपास ४० कोटी रूपये जप्त करण्यात आलेले आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -