घरअर्थसंकल्पीय अधिवेशन 2023प्रत्येक निवासी, कमर्शियल इमारतीत हिरकणी कक्ष; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

प्रत्येक निवासी, कमर्शियल इमारतीत हिरकणी कक्ष; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

Subscribe

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपण महिलांसाठी खास हिरकणी कक्ष सुरु केले आहे. त्यापुढे जात आता बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत २५० चौ. फुट जागा हिरकणी कक्षासाठी दिली जाणार आहे. त्याचा एफएसआय मोजला जाणार नाही. ही जागा मोफत दिली जाणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

मुंबईः नवीन निवासी आणि कमर्शियल इमारतीत हिरकणी कक्ष असणार आहे. २५० चौ.फुट यासाठी जागा दिली जाईल. त्याचा एफएसआय मोजला जाणार नाही. ही जागा मोफत दिली जाणार आहे, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी विधानसभेत जाहिर केले.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, आपण महिलांसाठी खास हिरकणी कक्ष सुरु केले आहे. त्यापुढे जात आता बांधकाम सुरु असलेल्या इमारतीत २५० चौ. फुट जागा हिरकणी कक्षासाठी दिली जाणार आहे. त्याचा एफएसआय मोजला जाणार नाही. ही जागा मोफत दिली जाणार आहे. हा महत्त्वाचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. प्रत्येक ५० किमी अंतरावर महिलांसाठी खास शौचालय बांधले जाणार आहे. तेथे स्वच्छता ठेवली जाईल. त्याची अंमलबजावणी तातडीने केली जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

उद्या उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात महिलांसाठीही खास योजना असतील. महिलांच्या ज्या काही समस्या आहेत त्याची यादी महिला आमदारांनी सादर करावी. त्यावर योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी स्पष्ट केले.

तसेच मुख्यमंत्री शिंदे यांनी जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला खास शुभेच्छा दिल्या. स्त्रीशक्ती, मातृशक्ती ही आपल्या संस्कृतीची ओळख आहे. या शक्तीचा आदर करूया. त्यांना समानतेचे, बरोबरीचे स्थान देऊया, असे आवाहन करतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी  जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या. मुलींनीही आपल्यातील या शक्तीला ओळखून संधींची नवी क्षितिजे ओलांडण्याची हिंमत बाळगावी. त्यासाठी सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल, असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.

- Advertisement -

 

प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष

प्रत्येक पोलीस ठाण्यात हिरकणी कक्ष सुरु केले जाणार आहे. जेणेकरुन महिला पोलिसांची कोणत्याही प्रकारे गैरसोय होणार नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले.

हेही वाचाः मुंबईकर महिलांसाठी मोबाईल जिम; महाराष्ट्र शासनाचं महिला दिनाचं खास गिफ्ट

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -