घरताज्या घडामोडीअनावश्यक सॅनिटायझर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई - एफडीए

अनावश्यक सॅनिटायझर खरेदी करणाऱ्यांवर कारवाई – एफडीए

Subscribe

सॅनिटायझर आणि सर्जिकल मास्कचा समावेश आता जीवनावश्यक वस्तु कायदा १९५५ अंतर्गत अत्यावश्यक वस्तु (essential comodity) म्हणून करण्यात आलेला आहे. म्हणून राज्याच्या अन्न व औषध प्रशासनाने ग्राहकांना अतिरिक्त सॅनिटायजर खरेदी करू नका असे आवाहन केले आहे. एखादी व्यक्ती अनावश्यकरीत्या सॅनिटायझर खरेदी करत असल्यास त्यावर लक्ष ठेवण्यात येईल असे अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त अरूण उन्हाळे यांनी स्पष्ट केले आहे.

आंतरराष्ट्रीय पातळीवर करोना व्हायरसच्या भीतीमुळे सॅनिटायर्झच्या मागणीत मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे बाजारात नियमित सॅनिटायजर्सचा पुरवठा होण्यासाठी आवश्यक असल्यावरच सॅनिटायजर खरेदी करा. करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता जनतेने आवश्यक तेवढेच सॅनिटायजर्झ खरेदी करावेत. एखाद्या व्यक्तीकडून जास्त सॅनिटायजर्झ खरेदी करण्यात आले तर बाझारात सॅनिटायजर्सचा तुटवडा निर्माण होईल. म्हणूनच आवश्यक तितकेच सॅनिटायजर्झ विकत घ्या असे आवाहन करण्यात आले आहे. ज्या व्यक्ती अतिरिक्त सॅनिटायजर्झर खरेदी करताना आढळतील त्यांच्यावर एफडीएची टीम नजर ठेवणार आहे. त्यांना कायद्याअंतर्गत शिक्षाही करण्यात येईल असाही इशारा एफडीएमार्फत देण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -