घरठाणे...अखेर एमपीएससीची संयुक्त परीक्षा लांबणीवर

…अखेर एमपीएससीची संयुक्त परीक्षा लांबणीवर

Subscribe

किमान 1900 विद्यार्थ्यांचे नुकसान टळले

ठाणे । एमपीएससीची पीएसआय पदासाठी 24 डिसेंबर रोजी होणारी संयुक्त परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे किमान 1900 विद्यार्थ्यांचे नुकसान टळले. याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एमपीएससीचे अध्यक्ष किशोरराजे निंबाळकर यांचे आमदार निरंजन डावखरे यांनी आभार मानले आहेत.
एमपीएससीमार्फत पीएसआय मुख्य परीक्षा-2022 ही 24 डिसेंबर रोजी होणार होती.

यापूर्वीची 2022 ची संयुक्त पूर्व परीक्षा गट – ब ही 8 ऑक्टोबर रोजी पार पडली होती. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार मुख्य परीक्षेसाठी केवळ अडीच महिन्यांचा कालावधी उपलब्ध झाला. त्यातच 24 डिसेंबर रोजी होणार्‍या परीक्षेत 2020 व 2021 च्या अंतिम निकालातील 1900 विद्यार्थी पुन्हा परीक्षा देणार होते. त्यामुळे 2022 मध्ये होणार्‍या परीक्षेतील विद्यार्थ्यांवर अन्याय होणार होता. त्यातून या सेवेतील अनेक पदे रिक्त राहण्याची शक्यता होती. त्यामुळे 2020 व 2021 च्या संयुक्त परीक्षेच्या अंतिम निकालानंतरच पीएसआय-2022 परीक्षा घेण्याची मागणी आमदार निरंजन डावखरे यांनी 22 नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि एमपीएससीचे अध्यक्ष यांच्याकडे केली होती. त्यानंतर आज एमपीएससीने संबंधित परीक्षा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -