घरमहाराष्ट्रमुख्यमंत्र्यांबाबतचे ते वादग्रस्त वक्तव्य भोवलं, चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

मुख्यमंत्र्यांबाबतचे ते वादग्रस्त वक्तव्य भोवलं, चंद्रकांत खैरेंविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

मुंबई – आज आनंद दिघे असते तर त्यांनी एकनाथ शिंदे यांना उलटं लटकवलं असतं, असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत खैरे यांनी केलं होतं. त्यांचं वक्तव्य त्यांच्या अंगलट आलं आहे. शिंदे गटाचे राजेंद्र जंजाळ यांच्या तक्रारीनंतर चंद्रकांत खैरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एकनाथ शिंदे यांचे डावपेच बऱ्याच दिवसांपासून चालले होते. आनंद दिघे असते तर त्यांना उलटं टांगलं असतं. ते गेल्यानंतर यांच्यात काय काय सुटलं हे राजन विचारे यांना किंवा तेथील शिवसैनिकांना विचारा असं खैरे म्हणाले होते. त्यांच्या विधानामुळे राज्यभर खळबळ उडाली आहे. शिंदे गटातून रोष व्यक्त केल जात होता. त्यामुळे राजेंद्र जंजाळ यांनी त्यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. या तक्रीरीची दखल घेत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -