घरताज्या घडामोडीरत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर ३ ओलिव्ह रिडले कासवांना बसवले सॅटेलाइट ट्रान्समीटर

रत्नागिरीच्या समुद्रकिनाऱ्यावर ३ ओलिव्ह रिडले कासवांना बसवले सॅटेलाइट ट्रान्समीटर

Subscribe

प्रथमा आणि सावनी हे कासव आधी रत्नागिरीच्या वेळास आणि अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर ट्रान्समीटर लावून सोडण्यात आले होते. यातील प्रथमा कासवाने समुद्र तळाच्या दक्षिणेकडे जवळपास ७५ किमीचा प्रवास केला होता. तर सावनी कासव उथळ पाण्यातच प्रवास करत होता.

Olice Ridley Turtles : वाइल्ड लाइफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या सहाकार्याने सागरी कासव निरीक्षण प्रकल्पांर्गत आज गुहागर येथे रेवा आणि लक्ष्मी ही दोन ऑलिव्ह रिडले जातीचे सागरी कासव सॅटेलाइट ट्रान्समीटर बसवून समुद्रकिनारी सोडण्यात आले. याआधी देखील तीन कासवांना ट्रान्समीट लावण्यात आले होते. वनश्री, प्रथमा आणि सावनी अशा त्या कासवांची नावे आहे. एकूण पाच कासवांना सध्या ट्रान्समीटर्स लावून त्यांच्याद्वारे निरीक्षण करण्यात येत आहे.

- Advertisement -

राज्य वन विभागाच्या मँन्ग्रोव्ह सेलनुसार, जिथे मॅन्ग्रोव्ह फाउंडेशन एक स्वायत्त आणि नोंदणीकृत काम करते. तिथे जवळपास ६०० ओलिव्ह रिडले कासव हिवाळ्यात महाराष्ट्रातील काही भागात आपली घरटी बांधायला सुरुवात करतात ज्यात महाराष्ट्रातील रत्नागिरी, सिंधुदूर्ग आणि रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे आहेत.

प्रथमा आणि सावनी हे कासव आधी रत्नागिरीच्या वेळास आणि अंजर्ले समुद्र किनाऱ्यावर ट्रान्समीटर लावून सोडण्यात आले होते. यातील प्रथमा कासवाने समुद्र तळाच्या दक्षिणेकडे जवळपास ७५ किमीचा प्रवास केला होता. तर सावनी कासव उथळ पाण्यातच प्रवास करत होता. आता गुहागर समुद्रकिनाऱ्यावर सोडण्यात आलेले रेवा आणि लक्ष्मी हे कासव मार्च महिन्यात समुद्राच्या खोल पाण्याच जाण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्रात अंडी दिल्यानंतर रिडल कासव मध्य पूर्व पाकिस्तान किंवा श्रीलंकेच्या दिशेने जाण्याची शक्यता आहे.

- Advertisement -

ओलिव्ह रिलडे कासवांची वैशिष्ट्ये

ओलिव्ह रिडले हे भारतीय आणि प्रशांत महासागराच्या उष्ण कटिबंधीय भागात आढळतात. हजारो किलोमीटरचा समुद्र प्रवास करुन केवळ मादी कासवासाठी येतात. तर मादी कासव जवळपास दोन वर्षांचा प्रवास करुन त्यांच्या मूळ प्रजनन स्थळावर परत येते.


हेही वाचा – OSA ज्या आजाराने बप्पी लहरींचे निधन झाले, नेमका काय आहे ‘ओएसए’ आजार

Minal Gurav
Minal Guravhttps://www.mymahanagar.com/author/minal/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रीय. मनोरंजन,लाईफ स्टाईल विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -