घरमहाराष्ट्रअहमदनगर : ट्रक कारचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार

अहमदनगर : ट्रक कारचा भीषण अपघात; ४ जण जागीच ठार

Subscribe

अहमदनगर – दौड महामार्गावर रात्री भीषण अपघात झाला असून या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

अहमदनगर – दौड महामार्गावर गुरुवारी मध्य रात्रीच्या सुमारास ट्रक आणि कारमध्ये भीषण अपघात झाला. या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. नगर तालुक्यातील बाबुर्डी बेंद परिसरात हा अपघात घडला असून या अपघातात मृत्यू झालेल्यामधील तीन जण भिंगार आणि एक जण वाळकी येथील आहेत.

असा घडला अपघात

अपघातग्रस्त कार श्रीगोंदयाहून नगरकडे येत असताना हा अपघात घडला आहे. बाबुर्डी बेंद परिसरातील महादेव वस्ती जवळ भरधाव कार पाठीमागून ट्रकला येऊन धडकली आणि हा अपघात झाला. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी जखमींना मदत करण्यासाठी धाव घेतली. या अपघातात जखमी झालेल्यांना सिव्हिल रुग्णालयात हलविण्यात आले. या अपघातात भिंगारचे तिघे जण जागीच ठार झाल्याने भिंगारवर शोककळा पसरली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -