घरमहाराष्ट्रनाशिकजरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सरणावर बसलेल्या बोरगुडेंचा उपोषणाचा चौथा दिवस

जरांगे पाटलांच्या समर्थनार्थ सरणावर बसलेल्या बोरगुडेंचा उपोषणाचा चौथा दिवस

Subscribe

नाशिक : मराठा आरक्षणासाठी पंधरा दिवसापासून आमरण उपोषण करीत असलेले जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ आमरण उपोषणास बसलेले नैताळे येथील शेतकरी वाल्मीक गंगाराम बोरगडे यांचा बुधवारी (दि. १३) उपोषणाचा चौथा दिवस होता. परिसरातील महिला, विद्यार्थी, विद्यार्थिन उपोषण स्थळी येऊन पाठिंबा देत आहे.

निफाडच्या प्रांताधिकारी हेमांगी पाटील, तहसीलदार शरद घोरपडे, तलाठी शंकर खडांगळे यांनी उपोषण स्थळी भेट देऊन तुमच्या भावना आम्ही शासनापर्यंत कळविलेल्या असून तुम्ही उपोषण सोडावे अशी विनंती प्रांताधिकारी हेमांगी पाटील यांनी केली. दिवसभराच्या कालखंडात राजेंद्र मोगल, दिगंबर गीते, विलासमत मत्सागर, आण्णाबाबा महाराज, डॉ. रोहीत धोक्रट, डॉ. हेमंत मंडलिक, डॉ. योगेश परदेशी, डॉ. नितिन धारराव, डॉ. नारायन लोखंडे, डॉ. रुपेश वाघ, राजू राणा, आर.पी.आयचे रवींद्र जाधव, संजय गायकवाड, वाघ, विनोद गायकवाड, सुरेश डांगळे, तुकाराम गांगुर्डे, आखाडा परिषेदेचे अध्यक्ष महंत शिवनंदगिरीजी महाराज, कैलास रायते, भैय्यासाहेब देशमुख, सचिन होळकर, कैलास तासकर, अजित सानप, राजेंद्र होळकर, अनिल सोनवणे, अ‍ॅड. रामनाथ शिंदे, अ‍ॅड. विजय मोगल, अ‍ॅड. पानगव्हाणे, अ‍ॅड. अमोल शिंदे, अ‍ॅड. श्रीकांत रायते, अ‍ॅड. प्रविण ठाकरे, अ‍ॅड. सागर कापसे, अ‍ॅड. रामनाथ सानप, किरण आवारे, राहुल दवते, दिलीप कुंभार्डे, चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय जाधव, संचालक राजेंद्र दवते, रवींद्र पवार यांनी प्रत्यक्ष भेटून पाठिंबा पत्र दिले.

- Advertisement -

अनेक मान्यवर, अधिकार्‍यांनी दिल्या भेटी

मराठा आरक्षणासंदर्भात राज्यभर ठिकठिकाणी शांततेत आंदोलने होत आहेत. मनोज जरांगे पाटील यांना समर्थन म्हणून नैताळे येथील शेतकरी वाल्मीक बोरगुडे चार दिवसापासून आमरण उपोषण करीत आहे. जिल्ह्यातील अनेक मान्यवर अधिकारी उपोषण स्थळ येऊन गेले. मात्र खासदार व आरोग्य राज्यमंत्री भारती पवार व पालकमंत्री दादा भुसे यांनी मात्र उपोषणाकडे कानाडोळा केल्याने स्थानिक ग्रामस्थ व मराठा बांधवांमध्ये त्यांच्या या कृतीबद्दल नाराजी दिसून आली.

मी सुरू केलेले उपोषण हे मनोज जरांगे पाटील यांना समर्थन असल्यामुळे त्यांनी आमरण उपोषण सोडले की मी पण सोडणार आहे. : वाल्मीक बोरगुडे, उपोषणकर्ते, नैताळे

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -