घरमहाराष्ट्रगडचिरोलीत कोम्बिंग ऑपरेशन; नक्षलवाद्यांचा शोध सुरु

गडचिरोलीत कोम्बिंग ऑपरेशन; नक्षलवाद्यांचा शोध सुरु

Subscribe

गडचिरोलीत झालेल्या नक्षलवादी हल्ल्याच्या घटनेनंतर कुरखेडा तालुक्यातून पुरडा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून या ठिकाणी सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे.

राज्यात सर्वत्र महाराष्ट्र दिनाचा उत्साह सुरू असतानाच गडचिरोलीमध्ये काल, बुधवारी दुपारी नक्षलवाद्यांनी केलेल्या भूसुरुंग स्फोटात क्युआरटी पथकातील १५ जवान शहीद झाले. या घटनेनंतर कुरखेडा तालुक्यातून पुरडा येथे जाणारा रस्ता बंद करण्यात आला असून या ठिकाणी सध्या कोम्बिंग ऑपरेशन सुरु आहे. अँटी माईल व्हेईकलचा वापर करुन या ठिकाणी अजून भुसुरुंग पेरले आहेत का? याचा शोध घेतला जाणार आहे. तसेच हे ऑपरेशन पूर्ण झाल्यानंतर संध्याकाळी हा रस्ता पुन्हा सुरु करण्यात येणार आहे.

- Advertisement -

मुख्यमंत्री गडचिरोलीला जाणार 

गडचिरोली जिल्ह्यातील जांभूरखेडा गावामध्ये नक्षलवाद्यांनी ईम्प्रोवाईज्ड एक्सप्लोझिव्ह डिव्हाईसच्या (आयईडी) सहाय्याने हा स्फोट घडवून आणला. या घटनेत सध्या जांमूळखेडा परिसरात कोम्बिंग अँड सर्चिंग ऑपरेशन सुरु करण्यात आले आहे. नक्षलवाद्यांचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज गडचिरोलीच्या घटनास्थळी भेट देमार असल्याचे सांगितले जात आहे. शिवाय आज, गुरुवारी दुपारी मुख्यमंत्र्यांनी मंत्रीमंडळाची बैठव बोलावली असून यामध्ये प्रामुख्याने नक्षलवाद आणि राज्यातील दुष्काळ या विषयांवर चर्चा होण्याची शक्यता आहे. तर दुष्काळ दौऱ्याची आखणीदेखील केली जाऊ शकते.

- Advertisement -

जंगलात नक्षलवादी लपण्याची शक्यता 

गडचिरोलीत झालेल्या हल्ल्याच्या ठिकाणी महाराष्ट्र पोलिसांचे नक्षलवाद विरोधी प्रमुख अधिकारी लवकरच दाखल होणार असल्‍याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. या ठिकाणच्या जंगलात नक्षलवादी लपले आहेत का याचा शोध घेतला जाणार आहे. क्युआरटी पथक पुरादा गावाकडे खासगी वाहनातून जात असताना दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास नक्षलवाद्यांनी त्‍यांच्या वाहनाला लक्ष्य करून स्फोट घडवला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -