घरदेश-विदेश'फनी' वादळामुळे ओडिशात रेड अलर्ट; ८ लाख नागरिकांचे स्थलांतर

‘फनी’ वादळामुळे ओडिशात रेड अलर्ट; ८ लाख नागरिकांचे स्थलांतर

Subscribe

बंगालच्या उपसागरातील हे फनी वादळ सध्या झपाट्याने ओडिशाच्या दिशेने सरकत असल्यामुळे ओडिशात रेड अलर्ट देण्यात आला आहे. तर ८ लाख नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले असून रेल्वेने या भागात जाणाऱ्या ८१ गाड्या रद्द केल्या आहेत.

उत्तर आणि मध्य भारतात कडाक्याचे ऊन पडत आहे. मात्र दुसऱ्या बाजूला दक्षिण भारतात चक्रीवादळ आणि जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात असताना बंगालच्या उपसागरातील हे फनी वादळ सध्या झपाट्याने ओडिशाच्या दिशेने सरकत असून शुक्रवारी, ३ मे रोजी हे वादळ जगन्नाथ पुरीच्या किनाऱ्यावर धडकेल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. जगन्नाथ पुरी येथे ताशी १७५ किलोमीटर जिल्ह्यांतील आठ लाखांहून अधिक नागरिकांचे आज सायंकाळपर्यंत स्थलांतर करण्याचे आदेश मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनी दिले आहेत. फनी वादळ ताशी सहा किलोमीटर वेगाने ओडिशाकडे सरकत आहे.

विध्वंसक वादळ

फनी वादळ पूर्ण क्षमतेने ओडिशावर स्थिरावल्यास १९९९नंतरचे हे सर्वात विध्वंसक वादळ ठरणार आहे. यापूर्वी देखील १९९९मध्ये सुपर वादळाने ओडिशातील १० हजार नागरिकांचे बळी घेतले होते. फनी वादळामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीशी झुंज देण्यासाठी नौदल, हवाई दल, तटरक्षक दल यांना सतर्क राहण्यास सांगण्यात आले आहे. हवामान विभागाने यलो वॉर्निंग जारी केली आहे. तसेच राज्यातील शैक्षणिक संस्था बंद ठेवण्यास राज्य सरकारने सांगितले आहे. दरम्यान, गंजम, पुरी, खुद्रा, कटक आणि जगतसिंहपूर या जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. वादळापासून नागरिकांचा बचाव करण्यासाठी ८८० छावण्या देखील उभारण्यात आल्या आहेत.

- Advertisement -

पुरी सोडण्याचे आवाहन

शुक्रवारी धडकणाऱ्या फनी वादळाची तीव्रता कमी होण्याची शक्यता नसल्याने आणि हे वादळ जगन्नाथ पुरीला आपल्या कवेत घेण्यासाठी येत असल्याने, ओडिशा सरकारने पुरी येथील पर्यटकांना पुरी सोडण्याचे बुधवारी आदेश दिले. फनी वादळ ताशी १७५ किलोमीटर या वेगाने ओडिशा किनाऱ्याकडे सरकत असून त्याचा वेग ताशी २०५ किलोमीटरपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात आले आहे.

रेल्वेगाड्या रद्द

ओडिशा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन राज्यांना फनी वादळाचा फटका बसला असून रेल्वेने या भागात जाणाऱ्या ८१ गाड्या रद्द केल्या आहेत. दरम्यान, दोन रेल्वेगाड्यांचे मार्ग देखील वळवण्यात आले आहेत.

- Advertisement -

वाचा – ‘फनी’ वादळाचे चक्रीवादळात होणार रुपांतर


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -