घरताज्या घडामोडीGangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारीचा ताबा महाराष्ट्र ATS कडे, न्यायालयाने...

Gangster Suresh Pujari : गँगस्टर सुरेश पुजारीचा ताबा महाराष्ट्र ATS कडे, न्यायालयाने सुनावली १० दिवसांची पोलीस कोठडी

Subscribe

कुख्यात गँगस्टर सुरेश पुजारीला अटक करण्यात आली असून त्याला भारतात आणलं गेलं आहे. फिलिपीन्समधून पुजारीला अटक करण्यात आली आहे. पुजारी विरोधात मुंबई, ठाणे, कल्याण, उल्हासनगर, डोंबिवली आणि कर्नाटक याठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत. भारतीय तपास यंत्रणांनी फिलिपिन्स येथून सुरेश पुजारीला अटक केली. पुजारीला महाराष्ट्र ATS ने ताब्यात घेतलं असून त्याला न्यायालयाने दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आयबी आणि सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी पुजारीला दिल्ली विमानतळावर ताब्यात घेतलं आहे. तर केंद्रीय यंत्रणांच्या चौकशीनंतर त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं आहे.

मुंबई आणि ठाणे पोलिसांनी खंडणी प्रकरणी त्याला २०१७ आणि २०१८ मध्ये रेड कॉर्नरची नोटीस दिली होती. २००७ मध्ये पुजारी भारतातून फरार झाला होता. अखेर १५ वर्षानंतर पुजारीला पकडण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. सुरूवातीच्या काळात रवी पुजारीने अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनसोबत काम केलं आहे.

- Advertisement -

कुठे होता सुरेश पुजारी?

२०१६ पासून सुरेश पुजारी फिलिपिन्समध्ये राहत होता. परंतु भारतीय पासपोर्ट २०१९ मध्ये संपुष्टात आला होता. त्यामुळे मंबईतील दोन विविध न्यायालयाद्वारे सुरेश पुजारीविरोधात वॉरंट जारी करण्यात आला होता. पुजारा हा मूळचा उल्हासनगर येथे राहणारा आहे. पुजारी आपलं नाव बदलून सुरेश पुरी आणि सतीश पई या नावानेही राहत होता.

रवी पुजारीने २००२ मध्ये अॅडव्होकेट माजिद मेमन यांच्यावर हल्ला केला होता. त्यानंतर २००६ मध्ये बॉलिवूड इंडस्ट्रीमधले चित्रपट निर्माते महेश भट यांच्या घराबाहेर गोळीबार केला होता. तसेच सर्वात महत्त्वाचं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांना धमकी सुद्धा दिली होती. त्यानंतर त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते. परंतु मुंबई पोलिसांकडून अटक करण्याआधीच तो भारतातून फरार झाला होता.

- Advertisement -

मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यातील डान्स बार मालकांना खंडणीसाठी तो फोन करायचा. २०१८ मध्ये सुरेश पुजारीच्या शूटर्सने कल्याण भिवंडी हायवे येथील एका हॉटेलला निशाणा करत अंदाधुंद गोळीबार केला होता.


हेही वाचा : मुंबई विद्यापीठाच्या कालीना परिसरातील फक्त २५ इमारतींना OC, माहिती अधिकारातून बाब उघड


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -