घरपालघरराजपत्रित अधिकारी महासंघाचे फडणवीसांना पत्र; म्हणाले- कलम 353 बदलण्याची कारवाई...

राजपत्रित अधिकारी महासंघाचे फडणवीसांना पत्र; म्हणाले- कलम 353 बदलण्याची कारवाई…

Subscribe

वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि काही अधिकाऱ्यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे.

वसई : मागील काही दिवसांपूर्वी वसई-विरारचे आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पालिका कार्यालयात जाऊन तुम्हाला फटकावीन अशी धमकी दिली होती. सध्या हे प्रकरण चांगलेच गाजत असून, शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी न्यायासाठी आता उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे दार ठोठावले आहे. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्याच्या राजपत्रित अधिकारी महासंघ या संघटनेने देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहत भादवी कलम 353 मध्ये बदल करावा अशी मागणी केली आहे.(Gazetted Officers Federation letter to Fadnavis Said Action to change Article 353)

वसई-विरार महापालिका आयुक्त अनिलकुमार पवार आणि काही अधिकाऱ्यांना आमदार हितेंद्र ठाकूर यांनी धमकी दिल्याचा आरोप आहे. याप्रकरणी महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहले आहे.

- Advertisement -

अशा प्रकारे लिहले फडणवीस यांना पत्र

वसई-विरारमधील आमदार हितेंद्र ठाकूर यांनी एका कार्यक्रमात पालिका कार्यालयात येऊन तुम्हाला फटकावीन असा दम अधिकाऱ्यांना दिला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य राजपत्रित अधिकारी महासंघाने गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिले. यात लिहिले आहे की, सार्वजनिक कार्यक्रमात लोकप्रतिनिधींकडून भा.प्र.से. अधिकाऱ्यांसह सर्वच वरिष्ठ अधिकाऱ्यांना अपशब्द वापरुन स्पष्टपणे धमकावण्याची घटना निश्चितच चिंताजनक आणि संतापजनक असल्याचे नमुद करण्यात आले आहे.

हेही वाचा : सिनेट निवडणूक स्थगितीचे कारण आले समोर; ‘या’ आमदाने पत्र लिहल्यामुळेच घडले असे

- Advertisement -

संरक्षण देणारा कायदा निष्प्रभ झाल्याचा उल्लेख

देवेंद्र फडणवीस यांना लिहलेल्या पत्रात नमुद आहे की, सरकारी कर्मचारी, राज्य अधिकाऱ्यांना हल्ले व धमक्यांपासून संरक्षण देणारे भादंविच्या कलम 353 मध्ये सुधारणा करणार असल्याची भूमिका फडणवीस यांनी अलीकडे विधिमंडळ अधिवेशनात घेतली होती. परंतु या कायद्यामध्ये तातडीने बदल करण्याची शासनाची कारवाई ही एकतर्फी आणि अधिकाऱ्यांचे मनोबल खच्चीकरण करणारी आहे. त्यामुळे शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांना संरक्षण देणारा हा कायदा निष्प्रभ झाला आहे असेही नमुद करण्यात आले आहे. परिणामी वसई विरारसारख्या अनुचित घटनांची वाढ होऊ शकते. त्यामुळे यासाठी एक बैठक तातडीने घेण्यात यावी अशीही मागणी करण्यात आली आहे.

हेही वाचा : Ajit Pawar : भाजपाच्या इतिहासाप्रमाणे एखादा लोकनेता…; रोहित पवारांनी अजितदादांबद्दल व्यक्त केली ‘ही’ भीती

कोण आहेत हितेंद्र ठाकूर?

हितेंद्र ठाकूर वसई-विरार, पालघर परिसरात त्यांचीच राजवट आहे. हितेंद्र ठाकूर हे बहुजन विकास आघाडी या पक्षाचे अध्यक्ष आहेत. बहुजन विकास आघाडीचे (VBA) सध्या तीन आमदार आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -