Eco friendly bappa Competition
घर क्रीडा राष्ट्रीय महिला धावपटू दुती चंद यांना 4 वर्षांची बंदी; नॅशनल अँटी डोपिंग...

राष्ट्रीय महिला धावपटू दुती चंद यांना 4 वर्षांची बंदी; नॅशनल अँटी डोपिंग एजन्सींची कारवाई

Subscribe

मुंबई : भारताची स्टार महिला धावपटू दुती चंदवर चार वर्ष निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. दुती चंद हिने प्रतिबंधित पदार्थांचे सेवन केल्यामुळे तिच्यावर ही कारवाई करण्यात येत आहे. दुती चंद हिने एंड्रोजन रिसेप्टर मॉड्यूलेटर या प्रतिबंधित पदार्थ तिच्या डोपिंग टेस्टमध्ये आढळून आला. यानंतर दुती चंदवर नॅशनल अँटी डोपिंग एजन्सींने चार वर्षांची निलंबनाची कारवाई केली आहे.

आशियाई स्पर्धेमध्ये दुती चंदाने भारताला विजय मिळवून दिला आहे. दुती चंदाने 2021मध्ये ग्रां प्रीमध्ये 100 मीटर स्पर्धा 11.17 सेकंदात पूर्ण करत राष्ट्रीय विक्रम आपल्या नावे केला होता. जानेवारी 2023 पासून दुती चंदावरील बंदी ग्राह्य धरली जाणार असून गेल्या वर्षी नॅशनल अँटी डोपिंग एजन्सीच्या अधिकाऱ्यांनी डोपिंग टेस्ट चाचणीसाठी तिचे नमुने घेतले होते.

- Advertisement -

हेही वाचा – India VS Pakistan : शोएब अख्तरची भविष्यवाणी, म्हणाला आगामी विश्वचषकात पाकिस्तान भारताला हरवेल

दुती चंदाच्या दोन वेळा डोपिंग टेस्ट

दुती चंदाच्या पहिल्या डोपिंग टेस्टमध्ये ऑस्टारिन, अँडारिन आणि लिंगंड्रोल आढळून आले. तर दुसऱ्या डोपिंग टेस्टमध्ये अँडारिन आणि ऑस्टारिन हे प्रतिबंधित पदार्थ आढळून आले होते. दुती चंदा हिने आशियाई गेम्स 2018 मध्ये 100 मीटर आणि 200 मीटर स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकले आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Asia Cup 2023 : लोकेश राहुलला संधी देऊ नका; भारताच्या माजी प्रशिक्षकाचा विरोध

दुती चंदा 4 वर्षासाठी निलंबन

दुती चंदा हिची 5 डिसेंबर 2022 रोजी भुवनेश्वरमध्ये डोपिंग टेस्ट घेण्यात आली होती. यानंतर दुती चंद डोपिंग टेस्टच्या जाळ्यात अडकल्यानंतर तिला तात्पुरते निलंबन केले होते. पण आता दुती चंदा हिचे चार वर्षांसाठी निलंबन केले आहे.

- Advertisment -