घरताज्या घडामोडीGoa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप सतर्क, देवेंद्र फडणवीस...

Goa Election 2022 : गोवा विधानसभा निवडणुकीच्या निकालापूर्वीच भाजप सतर्क, देवेंद्र फडणवीस गोव्याला जाणार

Subscribe

गोवा विधानसभा निवडणूक निकालापूर्वी भाजप आणि इतर राजकीय पक्ष सतर्क झाले आहेत. गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण झाली तर काय करणार यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. दरम्यान भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी धडपड सुरु झाली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी गोव्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. गोव्यातील स्थानिक नेत्यांची बैठक घेऊन फडणवीस सविस्तर चर्चा करतील. गोव्यात २०१७ मध्ये भाजपकडे बहुमत नसतानाही सरकार स्थापन केले असाच प्रयत्न आताही होऊ शकतो. काँग्रेसला मागील विधानसभा निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळाले होते परंतु आता जनाधार कोणाला मिळतो हे येत्या १० मार्च रोजी स्पष्ट होणार आहे.

राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी गोवा दौऱ्यावर जाणार आहेत. गोव्यातील विधानसभा निवडणुकीवर आणि प्रचारामध्ये देवेंद्र फडणवीस स्वतः लक्ष ठेवून आहेत. यापूर्वी फडणवीसांनी अनेकवेळा गोवा दौरा केला आहे. निवडणुकीच्या मतदानानंतर पहिल्यांदाच फडणवीस गोव्यात जाणार आहेत. गोव्यात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. गोव्यात भाजप, काँग्रेसमध्ये लढत आहे. तसेच स्थानिक प्रादेशिक पक्षाचेही बळ वाढताना दिसत आहे. अशा परिस्थितीमध्ये काय करता येईल याबाबत देवेंद्र फडणवीस स्थानिक भाजप नेत्यांशी चर्चा करतील.

- Advertisement -

राज्यातील ५ जिल्ह्यांत विधानसभा निवडणूक पार पडली यामध्ये महाराष्ट्रातील जे नेते गोवा, उत्तर प्रदेश आणि इतर जिल्ह्यांचे निवडणूक प्रभारी होते त्यांची एक बैठक मंगळवारी आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत निकालाबाबत आणि पुढील रणनितीबाबत चर्चा करण्यात येऊ शकते.

राज्यातील विकास कामे आणि इतर राजकीय विषायंवर चर्चा करण्यात येण्याची शक्यता आहे. राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अटकेनंतर त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर चर्चा करण्यात येईल. भाजपकडून ९ मार्चला मुंबईत मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. नवाब मलिकांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. हा मोर्चा झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस गोवा दौऱ्यावर जाणार आहेत.

- Advertisement -

गोव्यात भाजपच्या कमी जागा निवडून आल्या तर काय रणनिती करायची याबाबत रणनिती ठरणार आहे. तसेच मागील वेळी काँग्रेसच्या सर्वाधिक जागा आल्या होत्या परंतु सरकार स्थापन करण्यासाठी वेळ लागला. या काळात भाजपने जोरदार प्रयत्न करुन आमदारांना भाजपकडे वळतं करुन गोव्यात भाजपचे सरकार स्थापन केलं.


हेही वाचा : …तर अर्थसंकल्पीय अधिवेशनावर बहिष्कार घालणार, शिवसेनेच्या 25 नाराज आमदारांचा इशारा

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -