घरमनोरंजनमहिला दिनानिमित्ताने 'अनन्या'चे पोस्टर आऊट; ह्रता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

महिला दिनानिमित्ताने ‘अनन्या’चे पोस्टर आऊट; ह्रता दुर्गुळेचा नवा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस

Subscribe

‘अनन्या’ म्हणजे वेगळेपण. इतरांपेक्षा वेगळी. अशीच एक दिलखुलास ‘अनन्या’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘शक्य आहे, तुम्ही जे ठरवाल ते शक्य आहे’, अशी सकारात्मक टॅगलाईन घेऊन ‘अनन्या’ या चित्रपटाचे पोस्टर आज जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने खास प्रेक्षकांच्या भेटीला आले. खूप काही सांगणाऱ्या या पोस्टरमध्ये धाडसी वृत्तीची अनन्या दिसत आहे, जी आनंदाने आयुष्य जगत आहे. तिच्या जिद्दीचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात मालिका विश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री ह्रता दुर्गुळे मुख्य भूमिकेत आहे.

या भूमिकेविषयी हृता दुर्गुळे सांगते की, ”आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा, सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे. तर चित्रपटाचे निर्माता रवी जाधव सांगतात की, ”आज महिला दिनानिमित्ताने अन्यना चित्रपटाचे पोस्टर आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. या निमित्ताने आम्ही सर्व महिलांचा सन्मान करत आहोत. जीवनातील प्रत्येक क्षण आनंदाने जगायला हवा. महिलांसाठी काहीही अशक्य नाही. फक्त त्यांची इच्छाशक्ती प्रबळ हवी.

- Advertisement -

तर निर्माता संजय छाब्रिया सांगतात की, ”जीवनाकडे बघण्याचा सकारात्मक दृष्टिकोन खूप मह्त्वाचा आहे. ‘अनन्या’मधून आपल्याला हेच पाहायला मिळणार आहे. अनन्याची ही कहाणी अनेकांसाठी प्रेरणादायी ठरेल.”

 

View this post on Instagram

 

A post shared by Ravi Jadhav (@ravijadhavofficial)

- Advertisement -

एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन प्रताप कड यांनी केले आहे. तर ध्रुव दास, रवी जाधव आणि संजय छाब्रिया यांनी निर्मात्याची धुरा सांभाळली आहे. नावाला सार्थ असणारी ‘अनन्या’ १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -