घरमहाराष्ट्र१ एप्रिलपासून गोकूळ दुधाच्या दरात वाढ; उत्पादकांना मोठा दिलासा

१ एप्रिलपासून गोकूळ दुधाच्या दरात वाढ; उत्पादकांना मोठा दिलासा

Subscribe

गोकूळ दूध संघाने म्हैस आणि गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या दरवाढीनुसार, म्हैशीच्या दुध आता ४३.५० रुपये प्रती लिटरनं विकलं जाणार आहे. तसचं, गायीचे दूध हे आता २९ रुपये लिटर दराने खरेदी केलं जाणार आहे.

गोकूळ दूध संघाने म्हैस आणि गायीच्या दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. ही वाढ १ एप्रिलपासून लागू करण्यात येणार आहे. या नव्या दरवाढीनुसार, म्हैशीच्या दुध आता ४३.५० रुपये प्रती लिटरनं विकलं जाणार आहे. तसचं, गायीचे दूध हे आता २९ रुपये लिटर दराने खरेदी केलं जाणार आहे. दूध दरात वाढ करण्याच्या निर्णयामुळं कोल्हापूर जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

गोकूळ दूध संघाच्या संचालक मंडळाची बुधवार ३० मार्च रोजी महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीमध्ये दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या दरवाढ करुन कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कठीण परिस्थितीत दिलासा देण्याचं काम गोकुळनं केलं असल्याची माहिती गोकूळचे अध्यक्ष विश्वास पाटील यांनी दिली. गोकुळ दूध संघ नेहमीच शेतकऱ्यांच्या पाठिशी असतो. नवीन सत्ता आल्यानंतर १० महिन्याच्या आत दुसऱ्यांदा दूध दरात वाढ केली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी, त्यांची आर्थिक उन्नती करण्यासाठी गोकुळ नेहमीच त्यांच्या पाठिशी असल्याचं विश्वास पाटील यांनी यावेळी म्हटलं.

- Advertisement -

या दरवाढीआधी म्हशीचे दूध हे ४१.५० प्रती लिटरने खरेदी केले जात होते. तसंच, गायीचे दूध हे २७ रुपये प्रती लिटरने खरेदी केलं जात होते. मात्र आता या दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. ही दरवाढ दुध उत्पादकांसाठी दिलासादायक असली तरी, सर्वासामान्यांच्या आर्थिक खर्चात वाढ होणारी आहे.

कोरोना संकटाचा दूध उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसला होता. सध्या जनावरांसाठी लागणाऱ्या खाद्यांच्या दरात देखील मोठी वाढ झाली आहे. अशा स्थितीत गोकूळ दूध संघाने दुधाच्या दरात केलेली वाढ शेतकऱ्यांना दिलासा देणारी आहे. महागाईच्या काळात दूध दरात झालेली दरवाढीमुळं शेतकऱ्यांना हातभार लागणार आहे.

- Advertisement -

हेही वाचा – Heat Wave : दिल्लीसह उत्तर भारतात रेकॉर्ड ब्रेक उष्णता, मार्चमध्येच तापमान 40 अंशांच्या वर, IMD चा इशारा

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -