घरमहाराष्ट्रसर्वसामान्यांसाठी खुशखबर! दिवाळीत ST धावणार; संपासंदर्भात उदय सामंत म्हणाले...

सर्वसामान्यांसाठी खुशखबर! दिवाळीत ST धावणार; संपासंदर्भात उदय सामंत म्हणाले…

Subscribe

मुंबई : ऐन दिवाळीच्या तोंडावर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाची घोषणा वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या नेतृत्वात एसटी कष्टीकरी जनसंघाचा हा संप करणार होते. एसटी कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोग आणि विविध मागण्यांसाठी संप पुकारण्यात येणार असल्याची घोषणा गुणरत्न सदावर्तेंनी केली होती. पण मंत्री उदय सामंत आणि एसटी कष्टकरी जनसंघा यांच्यात बैठक झाल्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेतून माहिती दिली.

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपासंदर्भात उदय सामंत म्हणाले, “एसटी कष्टकरी जनसंघ यांच्यासोबत झालेल्या बैठकीत सकारात्मक चर्चेनंतर त्यांनी आंदोलन मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. गुणरत्न सदावर्ते हे कष्टकरी जनसंघाच्या पदाधिकारी असून एसटी कर्मचाऱ्यांवर अन्याय होत असेल तर सरकार त्यांना मदत करणे ही आमची भूमिका असून दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे”, असे उदय सामंत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – गुणरत्न सदावर्तेंनी दिली एसटी संपाची हाक, पण कर्मचारी देणार का साथ?

सरकार मराठ्यांना टिकणारे आरक्षण देणार

उदय सामंत पुढे म्हणाले, “गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबत एसटी कर्मचाऱ्यांसदर्भात चर्चा झाली. यामुळे मराठा आरक्षणाबाबतचे त्यांचे विचार आम्हाला मान्य आहे, असे होत नाही. सदावर्ते आणि आमच्यातील मतभेद हे कायम आहेत. आम्हाला मराठ्यांना टिकणारे आरक्षण द्याचे आहे.”

- Advertisement -

हेही वाचा – ‘सदावर्तेंची ही राजकीय खेळी…’, एसटी संपाच्या मुद्द्यावरून सुषमा अंधारेंची सडकून टीका

बैठकीत ‘या’ निर्णयावर झाली चर्चा

  • आजपासून एसटी कर्मचाऱ्यांनी संप मागे घेतला आहे.
  • येत्या चार वर्षात एसटीमध्ये 9 हजार बसेस दाखल होतील
  • दिवाळीनंतर मुख्यमंत्र्यांसोबत बैठकीचे आयोजन करणार
  • बोनस वाढीसंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील आणि तो जाहीर करतील.
  • पुढील दोन वर्षात अडीच हजार ईव्ही गाड्यात दाखल होणार
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -