घरताज्या घडामोडीगोपीचंद पडळकरांचे धनगरी पेहराव ! धनगर आरक्षणाच्या जागरासाठी समाजाला आवाहन

गोपीचंद पडळकरांचे धनगरी पेहराव ! धनगर आरक्षणाच्या जागरासाठी समाजाला आवाहन

Subscribe

घरातून सर्वांनी धनगरी पोशाख परिधान करुन अहिल्यामातेला वंदन करुन उत्सव साजरा करायचा

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी धनगरी वेशातून धनगर आरक्षणाचा (dhangar reservation) जागर करण्यासाठी समाजाला आवाहन केले आहे. गोपीचंद पडळकरांनी ३१ मे रोजी देशातील समस्त बहुजनांच्या प्रेरणास्त्रोत माता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून आपल्या ताकदीची वज्रमुठ मजूबत करायची आहे. धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा आहे असे म्हटले आहे. धनगर आरक्षणाच्या मुद्दायवर आंदोलनाची तयारी सुरु केली आहे. पडळकरांनी धनगरी पेहराव करुन समाजाला आवाहन केले आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्ह सुरु असताना समाजाला आपल्या धनगरी पेहरावाचे फोटो शेअर करण्याचे आवाहन केले आहे.

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांनी ३१ मे रोजी महाविकास आघाडीला धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ असे आवाहन धनगर समाजाला केले आहे. ३१ मे रोजी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जयंती मोठ्या स्वरुपात साजरी करता येणार नाही. परंतु घरातून सर्वांनी धनगरी पोशाख परिधान करुन अहिल्यामातेला वंदन करुन उत्सव साजरा करायचा आहे. असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले आहे.

- Advertisement -

गोपीचंद पडळकारंचे आवाहन

गोपीचंद पडळकर यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक व्हिडिओ शेअर करत धनगर समाजाला आवाहन केले आहे. धनगर आरक्षणाचा निर्धार मनाशी पक्का करायचा आहे. मी चौंडी येथून पुण्यश्लोक अहिल्यादेवींना वंदन करताना फेसबुक लाईव्हद्वारे आपल्या सर्वांशी संवाद साधणार आहे. त्यावेळी आपण कमेंटमध्ये आपले पारंपारिक पोशाखातील फोटो टाकून आपली ताकद दाखवायची आहे. धनगर आरक्षणाचा जागर करायचा आहे. चौंडी येथे दरवर्षी आपण लाखोंच्या संख्येने उपस्थित राहतो परंतु कोरोनामुळे या वर्षी उपस्थित राहता येणार नाही. धनगर समाजासाठी फडणवीस सरकारने १००० कोटी तरतूद केली होती परंतु महाविकास आघाडी सरकारने एकही रुपया खर्च केला नाही त्यामुळे या सरकारला धनगर समाजाची ताकद दाखवून देऊ असे आवाहन गोपीचंद पडळकर यांनी धनगर समाजाला केले आहे.

Swapnil Jadhav
Swapnil Jadhavhttps://www.mymahanagar.com/author/jswapnil/
मागील तीन वर्षापासून डिजिटल मीडिया क्षेत्रात सक्रिय आहे. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. डिजिटल मीडियाचा अनुभव, वार्ताहर, अँकरिंगचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -