घरमनोरंजनअज्ञात व्यक्तीचा सोनालीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, वादात वडील जखमी!

अज्ञात व्यक्तीचा सोनालीच्या घरात घुसण्याचा प्रयत्न, वादात वडील जखमी!

Subscribe

सोनालीच्या गैरहजेरीत असा धक्कादायक प्रकार घडताना पाहून सोनाली आणि तीचे  संपूर्ण कुटुंब सध्या घाबरलं आहे.

कलाकार आणि त्यांची प्रसिद्धी पाहता अनेक चाहत्यांना त्यांना पाहण्याची भेटण्याची इच्छा जागृत होते. कोणत्याही पद्धतीने त्यांच्या आवडत्या सेलेब्रिटींच्या नजरेत येण्यासाठी कधी ट्रोल करतात तर कधी असं काही करून जातात की सेलिब्रिटींना देखील त्यांची भीती वाटू लागते.अशीच एक घटना अभिनेत्री सोनाली कुलकर्णीच्या घरी घडली आहे. या फॅनने चक्क सोनालीच्या घरात घुसून हल्ला बोल केला आहे. जाणून घेऊया सविस्तर घटने बद्दल.
सोनालीच्या पिंपरी चिंचवड मधील घरी एका अज्ञात इसम अचानक घरात घुसण्याचा प्रयत्न केला. सोनालीच्या वडिलांना त्याने मी सोनालीचा चाहता आहे. माला तुमच्या घरात राहू द्या म्हणत घरात घुसू लागला. सोनालीच्या वडिलांनी प्रसंगवधान राखत त्याला घराबाहेर काढण्याचा संपूर्ण प्रयत्न केला आणि त्या दोघांमध्ये झटापट झाली. या वाद- विवादा दरम्यान सोनालीचे वडील मनोहर कुलकर्णी यांना काहीशी दुखापत झाली. सर्व घटनेनंतर त्यांनी पोलिसात धाव घेत त्या अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी सध्या संबधित व्यक्तीला ताब्यात घेतले आहे.
सोनालीच्या गैरहजेरीत असा धक्कादायक प्रकार घडताना पाहून सोनाली आणि तीचे  संपूर्ण कुटुंब सध्या घाबरलं आहे. सोनाली नुकतीच विवाहबंधनात अडकली असून ती आपल्या पती सोबत दुबई मध्ये आहे.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

- Advertisement -

कलाकारांना अनेकदा त्यांच्या क्रेझी फॅन मुमेंटला सामोरे जावे लागते. कधी कधी चाहते सोशल मीडियाद्वारे आत्महत्या करू असे देखील मेसेज करतात. तर कधी हात कापण्याचे देखील वेडसर प्रकार करतात.याचप्रमाणे मोठ्या कार्यक्रमादरम्यान देखील चाहत्यांचं प्रेम उतू जाते अनेकदा ते गोंधळ घालून सेलिब्रिटींच्या जवळ जाण्याच्या प्रयत्न करतात. यामुळे प्रसंगावधान राखता राखता सेलिब्रिटींच्या नाकी नऊ येते. आणि हा फॅन मुमेंट डोकेदुखीचं कारण  बनतो.

- Advertisement -

हे हि वाचा – MoneyHeist सिरिजच्या चाहत्यांसाठी खुशखबर,’या’ तारखेला रिलीज होणार पाचवा सीझन!

Mukta Londhe
Mukta Londhehttps://www.mymahanagar.com/author/mukta/
गेली दोन वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, रिपोर्टींग आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -