घरCORONA UPDATECorona : कोरोनाची सौम्य लक्षणे अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करतात- संशोधन

Corona : कोरोनाची सौम्य लक्षणे अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करतात- संशोधन

Subscribe

कोरोनाच्या सौम्य लक्षणातून बरे झालेला रुग्णाच्या शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती कोरोनाविरुद्ध अँटीबॉडी निर्माण करण्यासाठी मदत करत आहे. असे एका संशोधनातून समोर आले आहे. अमेरिकेच्या सेंट लुईस येथील वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनच्या संशोधकांनी असे नमूद केले की, शरीरातील रोगप्रतिकार शक्ती आयुष्यभर टिकून राहते आणि ती अँडीबॉडीजचे संरक्षण करते.

सोमवारी ‘नेचर’ या जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अभ्यासानुसार असे दिसून आले की, सौम्य कोरोनाबाधितांमधील दीर्घकालीन अँडीबॉडी़चे प्रमाण घटते आणि सतत आजारपण होण्याचे असामान्य घटना घडतात. दरम्यान कोरोना संसर्गानंतर शरीरातील अँटीबॉडी लवकर कमी होत असल्याचे अहवाल समोर येत आहे. याचा अर्थ असा की संसर्गानंतर शरीरातील रोगप्रतिकारशक्ती दीर्घकाळ टिकत नाही. असे वॉशिंग्टन युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनचे सहयोगी प्राध्यापक अली एलेबेडी म्हणाले. परंतु या अहवालांचा चुकीचा अर्थ लावला जात आहे. कारण तीव्र संसर्गानंतर अँटीबॉडीची पातळी खालावणे हे सामान्य आहे, परंतु ही पातळी शून्यावर जात नाही असेही एलेबेडी म्हणाले. पहिल्या लक्षणांनंतर ११ महिन्यांनी व्यक्तीच्या शरीरात अँटीबॉडी तयार करणाऱ्या पेशी संशोधकांना आढळल्या आहेत. तर या पेशी उर्वरित व्यक्तींच्या शरीरात अँडीबॉडीजचे उत्पादन करतील त्यामुळे दीर्घकाळ रोगप्रतिकारशक्ती मजबूत होईल असेही ते म्हणाले.

- Advertisement -

कोरोना संसर्गाच्यावेळी, अँडीबॉडी शरीरात रक्तामध्ये वेगाने रोगप्रतिकारक शक्ती निर्माण करते. त्यामुळे शरीरातील अँडीबॉडचे प्रमाण अधिक वाढते. एकदाका संसर्गाची झाल्यास शरीरातील बहुतेक पेशी मरतात त्यामुळे रक्तातील अँडीबॉडीची पातळी कमी होते. अँटीबॉडी उत्पादक पेशींतील काही पेशी ज्याला प्लाम्झा पेशी म्हणतात, त्या हाडांच्या मज्जासंस्थेत पोहचून तिथेच स्थिरावता असेही संशोधनात आढळले आहे, या अस्थिमज्जा संस्थेमध्ये या पेशी सतत कमी प्रमाणात अँटीबॉडी रक्तप्रवाहीत करतात. जेणेकरून विषाणूच्या संसर्गापासून वाचता येईल. एलेबेडी आणि सहकारी आधीच कोरोना संसर्गातून बचावलेल्या रक्ताच्या नमुन्यांमधील अँडीबॉडीचे पातळी शोधण्यासाठी एका प्रकल्पावर काम करत आहेत. त्यांच्या टीमने यासाठी ७७ कोरोना संक्रमणानंतर जवळपास १ महिन्यानंतर आणि त्यानंतर ३ महिन्यांच्या अंतराने रक्ताचे नमुने गोळा केले. यातील बहुतांश कोरोनाबाधितांना सौम्य लक्षणे होती तर ६ रुग्णांना रुग्णालयात दाखल करावे लागले.


 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -