घरठाणेठाण्याच्या ग्रिहिथा विचारेने अवघ्या नवव्या वर्षी केला विक्रम, माउंट किलीमांजारोवर फडकवला तिरंगा

ठाण्याच्या ग्रिहिथा विचारेने अवघ्या नवव्या वर्षी केला विक्रम, माउंट किलीमांजारोवर फडकवला तिरंगा

Subscribe

ठाणे : वयाच्या अवघ्या नवव्या वर्षी ठाण्याच्या ग्रिहिथा विचारे हिने महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोविला आहे. ग्रिहिथा विचारने स्वातंत्रदिनी भारताचा तिरंगा दक्षिण आफ्रिकेच्या माउंट किलीमांजारो फडकवला आहे. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्रिहिथा विचारे यांच्या धाडसी मोहिमेचे कौतुक केले आहे.

ग्रिहिथा विचारेंनी जगातील सर्वात उंच शिखर म्हणून ओळखले जाणारे माउंट एव्हरेस्ट. पण हिमालायच्या पर्वत रांगेतील अजून एक उंच शिखर आहे आणि हे शिखर जगातील सर्वात उंच स्टॅंड अलोन माऊंटन म्हणून आहे. हे उंच शिखर दक्षिण आफ्रिकेतील टांझानियामधील माउंट किलीमांजारो (Kilimanjaro) ज्याची उंची समुद्र सपाटी पासून 5895 मीटर इतकी आहे. ग्रिहिथा विचारने ट्रेकिंग मरांगू गेट (1879 मीटर) मंदारा हट (2720 मीटर) होरोम्बो हट (3720 मीटर) किबो हट (4720 मीटर) गिलमन्स (5685 मीटर) उहुरु शिखर मार्गे केला आहे.

- Advertisement -

ग्रिहिथाने माउंड किलीमांजारोवर झेंडा फडकवत भारताचे नाव मोठे केले आहे. हा मार्ग ट्रेकर्सना क्लासिक किलीमांजारो गिर्यारोहणाचा अनुभव प्रदान करतो, उहुरु शिखराच्या शिखरापर्यंत सर्व मार्गाने विलोभनीय दृश्ये आणि एक अद्भुत हायकिंग साहस प्रदान करतो. वयाच्या 9 वर्षांच्या ग्रिहिथाच्या कामगिरीचे सर्व स्थरातून कौतुक होत आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -