घरमहाराष्ट्रट्रक उलटला,गुटखा सापडला

ट्रक उलटला,गुटखा सापडला

Subscribe

गुजरातमधून आलेला १५ लाखाचा गुटखा जप्त

मुंबई-अहमदाबाद हायवेवर मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरई सातीवली येथे अत्यावश्यक सेवेचा फलक असलेला ट्रक सोमवारी रात्री उलटल्यानंतर एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. घटनास्थळी पोचलेल्या पोलिसांनी पंचनामा सुुरू केला असता भाजीपाल्याच्या गोणींच्या खाली चक्क गुटख्याच्या गोणी आढळून आल्या. गुजरातहून आलेल्या या ट्रकमध्ये 15 लाख रुपये किमतीचा गुटखा सापडला. अपघातानंतर चालक पसार झाला असून पोलीस मालक आणि चालकाचा शोध घेत आहेत. या ट्रकला दिल्ली सरकारच्या कृषी उत्पन्न समितीचा अत्यावश्यक सेवेचा परवाना देण्यात आल्याचे उजेडात आले आहे.

लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी शासनाने जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणार्‍या वाहनांना परवानगी दिली आहे. मात्र त्याचा गैरफायदा घेऊन मोठ्या प्रमाणावर गुटख्याची तस्करी होत असल्याचे या प्रकारानंतर उजेडात आले आहे. गुजरातहून मुंबईत रोज मोठ्या प्रमाणावर जीवनावश्यक वस्तू घेऊन वाहने येतात.

- Advertisement -

असाच भाजीपाला घेऊन येणारा ट्रक पालघरमधील सातीवली येथे चालकचा ताबा सुटल्याने उलटला. ट्रकमध्ये भाजीपाल्यात मोठ्या प्रमाणावर गुटखा लपवण्यात आला होता. या संदर्भात मनोर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सुमारे 15 लाख रुपये किमतीचा गुटखा आणि 20 लाख रुपये किमतीचा ट्रक असा एकूण 35 लाख रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. संबंधित गाडीचा मालक आणि चालकावर गुन्हा नोंदवण्यात आला आहे. दरम्यान अपघातानंतर चालक पसार झाला आहे.

या ट्रकला दिल्ली सरकारचा अत्यावश्यक सेवेचा परवाना आहे. तो पोलिसांना अपघातस्थळी मिळाला आहे. मात्र संपूर्ण राष्ट्रीय महामार्ग पार करून मनोर पोलीस ठाण्याच्या हद्दीपर्यंत हा ट्रक पोचला कसा? याचा तपास सुरू आहे. मनोर पोलिसांनी हा ट्रक गुटख्यासह जप्त केला आहे. कोविड 19 च्या आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत येणार्‍या सर्व कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -