घरदेश-विदेशधारावी प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा; पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे व्यक्त केली अपेक्षा

धारावी प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा; पंतप्रधानांनी मुख्यमंत्री शिंदेंकडे व्यक्त केली अपेक्षा

Subscribe

मुंबई | धारावी प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा, अशी अपेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री एकनथा शिंदे यांच्याकडे व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सहकुटुंब पंतप्रधानांची भेट घेतली. या भेटीदरम्यान, इर्शाळवाडी दुर्घटना, शेतकरी, पाऊस आणि राज्यातील प्रकल्पासंदर्भात चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली.

पंतप्रधानांनी स्वत: धारावी प्रकल्पाची आठवण केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना सांगितले. मुख्यमंत्री म्हणाले, “या प्रकल्पामुळे लोकांचे जीवनमान उंचावले. यामुळे धारावी प्रकल्प लवकरच पूर्ण व्हावा, अशी पंतप्रधांनाची अपेक्षा आहे,” असल्याचे त्यांनी माध्यमांना सांगितले. तसेच पंतप्रधानांनी भेटीदरम्यान वडिलांशी गप्पा मारल्याचे मुख्यमंत्र्यांनी आवर्जून सांगितले.

- Advertisement -

दरम्यान, मुंबई आणि एमएमआरमध्ये पुनर्विकास प्रकल्पांना चालना देण्याविषयी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत चर्चा झाल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी माध्यमांना दिली. त्याबरोबर पंतप्रधानांसोबत मेट्रो, कारशेड, बुलेट ट्रेनपासूनचे जे सर्व पायाभूत प्रकल्पासंदर्भात चर्चा झाली. याबरोबर मराठवाडा वॉटरग्रीड आणि राज्यातील कोकणातील समुद्राकडे वाहून जाणारे पाणी दुष्काळग्रस्त भागाकडे वळवणे, या राज्यातील प्रकल्पासंदर्भात माहिती पंतप्रधानांना सांगितल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

हेही वाचा – इर्शाळवाडीतील ग्रामस्थांनचे पुनर्वसन करा, मुख्यमंत्र्यांच्या ‘सिडको’ला सूचना

- Advertisement -

राज्य सरकार निर्णयाच्या पाठीशी केंद्र सरकार असेल

इर्शाळवाडी दुघटनेसंदर्भात पंतप्रधानांंनी काय म्हणाले?, “राज्य सरकार लोकांसाठी जे निर्णय घेईल, त्याबरोबर केंद्र सरकार पूर्ण ताकतीने उभे राहिली”, असे पंतप्रधान म्हणाल्याचे मुख्यमत्र्यांनी सांगितले.  पंतप्रधान मोदींसोबत शिंदे कुटुंबियांनी सदिच्छा भेटीसंदर्भतील प्रश्नावर मुख्यमंत्री म्हणाले, “पंतप्रधानांना भेटायची इच्छा सर्वांनाच असते आणि ती भेट झाली याचा आनंद माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावर दिसत होता.

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -