घरताज्या घडामोडीमुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट जारी

मुंबई, पुण्यासह कोकणात मुसळधार पावसाची शक्यता, विदर्भात यलो अलर्ट जारी

Subscribe

मागील काही दिवसांपासून राज्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मागील 24 तासांत मुंबईसह उपनगरात पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मुंबईतील काही रस्ते जलमय झाले आहेत. तर मुंबईच्या धरणांतील पाणी पातळीत वाढ देखील झाली आहे. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बुलढाणा, परभणी, वर्धा, नांदेड, अकोला जिल्ह्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तर विदर्भात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

राज्यातील अनेक भागात आजही मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पालघर आणि रायगड जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. याशिवाय कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील कोयनेतूनही पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे.

- Advertisement -

हवामान विभागाने रत्नागिरीसह पुणे आणि विदर्भातील काही ठिकाणी यलो अलर्ट दिला आहे. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन देण्यात आलं आहे.

- Advertisement -

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने शुक्रवारी ठाणे शहरात कहर सुरू ठेवला. सकाळी साडेआठ ते दुपारी अडीच या सहा तासात ८७.३८ मिमी पावसाची नोंद झाली. तर ठाणे शहरातील सखल भागांसह अन्य पाच ठिकाणी पाणी साचले. याचदरम्यान भातासा धरणातील पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी पाण्याचा विसर्ग सुरू केला होता. आज देखील ठाण्यात मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. भिवंडी शहरालगत असलेल्या कामवारी नदीला पूर आला आहे. यामुळे नदीच्या किनारी असलेल्या 10 ते 12 घरांमध्ये पाणी शिरले आहे. त्याचप्रमाणे नदी काठच्या गावातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.


हेही वाचा : नागपूरच्या मेडिकल रुग्णालयात वेळेवर व्हेंटिलेटर न मिळाल्याने मुलीचा मृत्यू


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -