घरमहाराष्ट्रराज्यभरात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

राज्यभरात आज आणि उद्या मुसळधार पावसाची शक्यता

Subscribe

मुंबई : राज्यातील काही भागात महिन्याभराच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावली आहे. तर राज्याच्या अजूनही काही भाग असे आहेत. ज्या ठिकाणी वरुण राजाने पाठफिरवली आहे. राज्यभरात गुरुवारी मुंबई आणि ठाण्यात पावसाच्या हजेरीने दहीहंडी उत्सव मोठा उत्सात पार पडला. संपूर्ण महाराष्ट्रात आज आणि उद्या मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

सध्या राज्यात पवासासाठी अनुकूल वातावरण तयार झाला आहे. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भातील काही जिल्ह्यांसह उत्तर महाराष्ट्रात पावसाने हजेरी लावली. तसेच जळगावात मध्यम स्वरुपाच्या पावसामुळे कापूस आणि सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. तसेच मुंबई आणि ठाण्यात गुरुवारी पावसाने हजेरी लावली. पावसामुळे सखल भागात पाणी साचले होते. तसेच ठाण्यात देखील पावसाचा जोर कायम होता.

- Advertisement -

हेही वाचा – Rain Update : गोपाळकालाच्या उत्साहात वरुण राजाची हजेरी, मुंबईत पुढील 4 दिवस पावसाचे

मुंबईत पुढील चार दिवस पावसाचा जोर कायम

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहणार आहे. तसेच, आज  आणि उद्या मुंबईमध्ये पावसाचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, 10 सप्टेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्या दिवशी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे राज्यातील उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -