Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र नाशिक ५० महिला झाल्या स्वावलंबी रिक्षाचालक, पहिल्या दोघींना 'दिव्यआकांक्षा'कडून रिक्षा सुपूर्द

५० महिला झाल्या स्वावलंबी रिक्षाचालक, पहिल्या दोघींना ‘दिव्यआकांक्षा’कडून रिक्षा सुपूर्द

Subscribe

नाशिक : महाराष्ट्र शासन अबोली रिक्षा प्रकल्प माध्यमातून कल्याणी महिला बहुद्देशीय सेवाभावी संस्था स्वयंशक्ती स्त्री उद्यमी फाउंडेशन व मनसे प्रणित दिव्य आकांक्षा सामाजिक बहुद्देशीय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महिलांना मोफत ऑटो रिक्षा प्रशिक्षण देण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन मनसे शहराध्यक्षा तथा माजी नगरसेविका अर्चना जाधव यांनी केले. या प्रकल्पात यशस्वीरित्या प्रशिक्षण पूर्ण केलेल्या ५० लाभार्थ्यांस शासनामार्फत रिक्षा देण्यात आल्या.

दिव्य आकांक्षा संस्थेच्या माध्यमातून साक्षी तुषार ढोले ,वैशाली तुपे या दोन लाभार्थींना रिक्षा माजी महापौर अशोक मुर्तडक, महिला प्रदेश उपाध्यक्षा सुजाता डेरे यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आल्या. रिक्षा प्रकल्पात रिक्षा प्रशिक्षण लायसन्स बिल्ला व परवाना मोफत देण्यात आले. तसेच राष्ट्रीय कृत बँकेकडून मुद्रा योजना अंतर्गत कमी व्याजदराने कर्ज देण्याची सुविधा देण्यात आली. कमी दरात डाऊन पेमेंटवर रिक्षासाठी लागणारे आवश्यक कागदपत्रासहित रिक्षा उपलब्ध करून दिली.

- Advertisement -

महिलांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी त्याच उद्देशाने स्वयमशक्तीच्या दिपाली चांडक व कल्याणी महिला संस्थेच्या सुनीता मोडक दिव्य आकांक्षा संस्थापिका तथा मनसे महिला शहराध्यक्ष अर्चना जाधव यांच्या प्रयत्नातून आज गरजू महिलांना व मुलीना रोजगारची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष सुदाम कोबंडे, नामदेव पाटील, निकीतेश धाकराव, नितीन माळी, धीरज भोसले ,जयश्री हिंगे, प्रियंका पाटील, हर्षदा कासार, उज्वला खैरनार, वंदना पगारे, निशा साळवे, संगीता ढोले, चार्वी चौधरी, मीनाक्षी मुसळे, रामचंद्र मुसळे, प्रभाकर बागुल, ईश्वर मानकर आदींसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कल्पना पठाडे यांनी प्रास्ताविक केले.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisment -