घरमहाराष्ट्रRain Update : गोपाळकालाच्या उत्साहात वरुण राजाची हजेरी, मुंबईत पुढील 4 दिवस...

Rain Update : गोपाळकालाच्या उत्साहात वरुण राजाची हजेरी, मुंबईत पुढील 4 दिवस पावसाचे

Subscribe

राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची नितांत गरज आहे. पण आज मुंबईत सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत पाऊस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.

मुंबई : गेल्या महिन्याभरापासून राज्यात सर्वच भागात पावसाने विश्रांती घेतलेली आहे. त्यामुळे शेतकरी चांगलाच चिंतेत सापडलेला पाहायला मिळत आहे. कारण पावसाने जुलै महिन्यात लावलेले हजेरी आणि त्यामुळे शेतकऱ्यांनी केलेली पेरणी आता संकटात सापडलेली आहे. शेतकऱ्यांवर आता दुबार तर काही शेतकऱ्यांवर आता तिबार पेरणीचा संकट ओढावलेले आहे. पावसाने दडी मारल्यामुळे आता शेतकऱ्यांची खरीपाची पिके वाया जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये आता पाणी टंचाईच्या संकटाने डोके वर काढलेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाची नितांत गरज आहे. पण आज मुंबईत सकाळपासून पावसाने हजेरी लावल्याचे पाहायला मिळत आहे. तर पुढील 4 दिवस मुंबईत पाऊस कायम राहणार असल्याचे भारतीय हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे. (Rain Update: Next 4 days of rain in Mumbai)

हेही वाचा – माजी नगरसेवक सुधीर मोरेंच्या आत्महत्येचे कारण आले समोर, वकील महिलेवर गुन्हा दाखल

- Advertisement -

भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईत पुढील तीन ते चार दिवस पाऊस कायम राहणार आहे. तसेच, उद्या म्हणजेच 8 सप्टेंबर आणि 9 सप्टेंबरला मुंबईमध्ये पावसाचा ग्रीन अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर, 10 सप्टेंबरला यलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. त्या दिवशी मुंबईत वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. आनंदाची बाब म्हणजे राज्यातील उत्तर कोकण, मराठवाडा, उत्तर मध्य महाराष्ट्र, पूर्व विदर्भ, पश्चिम विदर्भातही पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, अरबी समुद्रात 4.43 वाजता 3.05 मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत मुसळधार पाऊस आणि उंच लाटांमुळे पूरसदृश परिस्थिती उद्भवू शकते. तसेच, गेल्या काही तासांपासून मुंबईत पावसाची संततधार कायम असल्याने पूर्व उपनगरात 15.87 मिमी आणि पश्चिम उपनगरात 12.45 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

- Advertisement -

आज राज्यभरात गोपाळकालाचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सकाळपासून सर्व दहीहंडी पथक रस्त्यावर उतरलेली पाहायला मिळत आहे. परंतु आज सकाळपासून पावसाने मुंबईसह राज्यातील अनेक भागांत जोरदार हजेरी लावल्याने पावसातही गोपाळांचा उत्साह हा पाहण्यासारखा आहे. त्यामुळे गेल्या कित्येक दिवसांपासून उकाड्याने हैराण झालेला मुंबईकर पावसाच्या हजेरीने सुखावलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -