घरमहाराष्ट्रआजही मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजना सुट्टी

आजही मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजना सुट्टी

Subscribe

राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी मुंबई, ठाणे, कोकणातील शाळा-कॉलेजना आजही सुट्टी असल्याची माहिती टि्वट द्वारे दिली.

बाप्पाच्या आगमनासोबत पावसाने जोरदार पुनरागमन केलं आहे. सलग तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने मुंबईसह अनेक भागाला झोडपून काढलं आहे. या मुसळधार पावसाने बुधवारी मुंबईमध्ये सामान्याचे जनजीवन झाले होते. तसेच ८ सप्टेंबरपर्यंत मुंबईसह महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामानखात्याने व्यक्त केला आहे. म्हणून गुरुवारी मुंबई, ठाणे आणि कोकण भागातील सर्व शाळा-कॉलेजना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. बुधवारी राज्याचे शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी टि्वट करून ही माहिती दिली आहे.

- Advertisement -

नक्की वाचा पावसामुळे रात्रभर अडकलेल्या रेल्वे मुंबईकरांची अखेर घरवापसी!

या संततधार पावसामुळे मुंबईकरांची लाईफलाईन विस्कळीत झाली होती. मात्र रात्री पासून पावसाने विश्रांती घेतल्याने मुंबईकरांची लाईफलाईन पूर्वपदावर येत आहे. बुधवारच्या या मुसळधार पावसामुळे गणेश भक्तांची देखील तारांबळ उडाली होती. तसेच मुंबईतील अनेक सखल भागात पाणी साचले होते. या मुसळधार पावसामुळे सार्वजनिक गणेशोत्सव समितीने गणेश मंडळांनी वीज प्रवाह बंद ठेवावेत, असे आवाहन केले होते.

- Advertisement -

हेही वाचा मुसळधार पावसाने लांब पल्ल्याच्या गाड्यांचं वेळापत्रक बदललं!

सध्या पाऊस नसल्याने रस्तांवरील पाणी ओसरले आहे. तसेच वाहतुक देखील सुरळीत सुरू झाली आहे. मात्र अतिवृष्टीचा इशारा दिल्याने मुंबई, ठाणे आणि रायगडमध्ये रेड अलर्ट जारी केला आहे. ‘गरज असेल तरच घराबाहेर पडा’, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे.

हेही वाचागणेशोत्सव मंडळांना पावसाचा फटका

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -