घरताज्या घडामोडीराज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..,गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर..,गृहमंत्री दिलीप वळसे पाटलांचा इशारा

Subscribe

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार आहे. या सभेला अद्यापही परवानगी देण्यात आलेली नाहीये. परंतु सध्याचं राजकीय वातावरण पाहिलं असता सभेबाबत उद्यापर्यंत परवानगी दिली जाईल, अशी माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी दिली आहे. दरम्यान, राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते सरकार सहन करणार नाही, अशा इशारा गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी मनसेला दिला आहे.

राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर…

दिलीप वळसे पाटील यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, सामाजिक परिस्थिती बिघडवण्याचा कोणी प्रयत्न करू नये. नियमाप्रमाणे आणि कायद्याप्रमाणे सर्वांना आपल्या कार्यक्रमानुसार पुढं जाता येईल. परंतु राज्यामध्ये अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला तर ते सरकार सहन करणार नाही. या संदर्भातील निर्णय औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता घेणार आहेत. तसेच माझ्या माहितीप्रमाणे ते परवानगी देतील, असं गृहमंत्री म्हणाले.

- Advertisement -

युसूफ लकडावालाबाबत काही गंभीर आरोप खासदार नवनीत राणांवर करण्यात आले आहेत, असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले की, हा आरोप त्यांच्या इलेक्शनच्या प्रतिज्ञापत्रावर आहे. त्याची आणखीन काही चौकशी करायची असल्यास आम्ही त्याची चौकशी करणार आहोत, असं वळसे-पाटील म्हणाले.

सभेच्या परवानगीबाबत उद्या निर्णय होणार

१ तारखेला औरंगाबादमध्ये होणाऱ्या सभेबाबत मी पोलीस आयुक्तांना विनंती केली. त्यांना आम्ही अर्ज दिलंय. त्यामुळे आमची अपेक्षा आहे की, ते आम्हाला परवानगी देतील. या सभेला परवानगी द्यायची की नाही याबाबत आम्ही उद्या निर्णय घेणार आहोत, असं आयुक्तांनी सांगितल्याचं मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी म्हटलं आहे.

- Advertisement -

१ तारखेला महाराष्ट्र दिन असल्यामुळे त्यांनी त्याबाबतची आम्हाला अधिक माहिती दिली. त्यामुळे परवानगीबाबत उद्यापर्यंत निर्णय होईल अशी माहिती पोलिसांनी दिली,असं नांदगावकर म्हणाले.


हेही वाचा : पानपट्टीवरील बिडी मिळते तशी ईडीची अवस्था, खासदार उदयनराजे भोसले यांचा हल्लाबोल


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -