घरमहाराष्ट्रपवारांनी ते जाणून बुजून केलं असं म्हणता येणार नाही, जयंत पाटलांची मलमपट्टी

पवारांनी ते जाणून बुजून केलं असं म्हणता येणार नाही, जयंत पाटलांची मलमपट्टी

Subscribe

मुंबई – अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथविधी ही शरद पवारांची खेळी असू शकते, असं मोठं वक्तव्य राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केलं होतं. यावरून राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. त्यातच, आपल्याच वक्तव्यावरून पाटलांनी आता घुमजाव करत स्पष्टीकरण दिलं आहे. मी तसं म्हणालोच नाही, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

शरद पवार यांची ही खेळी असल्याचं बोललो नाही. ते मी गेस केलं होतं. जो घटनाक्रम बघितला होता आणि त्या घटनाक्रमाचा फायदा हे राष्ट्रपती राजवट हटवण्यासाठी होता. त्यामुळे पवार साहेबांनी ते जाणूनबुजून केलं असं म्हणता येत नाही, असं जयंत पाटलांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा शरद पवार भाजपसोबतच; प्रकाश आंबेडकरांचा खळबळजनक दावा

राज्याचे राजकारण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याभोवीत फिरत असतं. त्यांचे निर्णय, त्यांचे आदेश यावर राजकारणाची दिशा ठरत असते. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०१९ ला झालेला पहाटेचा शपथविधीही शरद पवारांच्या सूचनेनुसार झाला होता, असा कयास तेव्हापासूनच लावला जात होता. मात्र, त्यावर कोणीही शिक्कामोर्तब अद्यापही केलेलं नाही. परंतु, ठराविक कालावधीनंतर पहाटेच्या शपथविधीचा विषय निघाला की शरद पवारांचं नाव पुढे येतंच. त्याचप्रमाणे खुद्द राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनीही पहाटेच्या शपथविधीमागे पवारांची खेळी असू शकते असा संशय व्यक्त केला होता. त्यावरून राजकारणात मोठी खळबळ उडाली होती. मात्र, जयंत पाटलांनी आता आपलं वक्तव्य मागे घेतलं आहे.

- Advertisement -

हेही वाचा – पहाटेचा शपथविधी : फडणवीसांनी दिले होते संकेत, जयंत पाटलांनी केले उघड

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -