घरमहाराष्ट्रसावरकर वादावर मला काहीही विधान करायचे नाही; करुणा मुंडेंची स्पष्ट भूमिका

सावरकर वादावर मला काहीही विधान करायचे नाही; करुणा मुंडेंची स्पष्ट भूमिका

Subscribe

गाढलेल्या मुडद्यांवर मला राजकारण करायचे नाही, सुरु असेलल्या या राजकीय वादावर मला कोणतेही विधान करायचे नाही असे स्पष्ट मत करुणा मुंडे यांनी मांडले

भारत जोडो यात्रेदरम्यान (bharat jodo yatra) काँग्रेस खासदार राहुल गांधी (rahul gandhi) हे देशातील जनतेशी संवाद साधत आहेत. दरम्यान राहुल गांधी यांनी सावरकर (savarkar) यांच्याबद्दल केलेल्या विधानावरुन चांगलाच वादंग निर्माण झाला आहे. राहुल गांधींचे हे विधान चुकीचे आहे असं म्हणत शिवसेनेने सुध्दा त्याचे समर्थन केले नाही तर राहुल गांधींचे हे विधान महाविकास आघाडीला धोक्यात आणणारे आहे असे संजय राऊत (sanjay raut) म्हणाले होते. यावरूनच आता राज्यातील राजकारण तापलं आहे. या सगळ्यावर धनंजय मुंडे यांच्या पत्नी करुणा मुंडे (karuna munde) यांनी सुद्धा त्यांची स्पष्ट भूमिका मांडली आहे.

करुणा मुंडे (karuna munde) यांनी पत्रकार परिषद घेतली होती त्यात त्यांनी राहुल गांधींवर टीका केली. राहुल गांधींनी विनायक दामोदर सावरकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले. त्यावरुनच भाजप, शिंदे गट आणि मनसेनेही (mns) त्याविरोधात आक्रमक भूमिका घेतली. या संदर्भात बोलताना करुणा मुंडे म्हणल्या, मला त्याबाबत काहीही विधान करायचे नाही. कारण, देशात, राज्यात अनेक प्रश्न आहेत. बेरोजगारी, नोकरी, शिक्षणासाठी वाढत असलेला खर्च, महिलांवरील अन्याय-अत्याचार हे आणि असे अनेक प्रश्न आहेत. त्यामुळे, गाढलेल्या मुडद्यांवर मला राजकारण करायचे नाही, सुरु असेलल्या या राजकीय वादावर मला कोणतेही विधान करायचे नाही असे स्पष्ट मत करुणा मुंडे यांनी मांडले

- Advertisement -

करुणा मुंडे यांनी पुण्यात (pune) पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. आपणही पदयात्रा सुरू करणार आहोत. राज्यातील नेतृत्व गुण असलेल्या वंचित युवकांना आपल्यासोबत घेऊन आपण राजकीय प्रवासाची सुरुवात करणार असलयाचे करुणा यांनी सांगितले. शिंदे गटाने जरा का आपल्या विचारांशी जुळवून घेतले तर आपण त्यांच्या सोबतही जाऊ असे मोठे विधान करुणा मुंडे यांनी केले.


हे ही वाचा –  राहुल गांधींनी महाराष्ट्रातील वातावरण बिघडवू नये; फडणवीसांचा थेट इशारा

nidhi pednekar
nidhi pednekarhttps://www.mymahanagar.com/author/nidhipednekar/
मागील ४ वर्षांपासून आकाशवाणीवर मुंबई येथे कंटेन्ट रायटर आणि अँकर म्हणून काम करण्याचा अनुभव, पॉलिटिकल पि.आर. मॅनेजमेंट क्षेत्रात काम करण्याचा अनुभव त्याचसोबत ललित, मनोरंजन, राजकीय घडामोडी, लाईफस्टाईल या विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -