घरमहाराष्ट्रमला काहीच बोलायचे नाही, माझं काम करू द्या!

मला काहीच बोलायचे नाही, माझं काम करू द्या!

Subscribe

अजित पवार यांची पार्थ यांच्याबद्दल प्रतिक्रिया

गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरू असलेल्या पार्थ पवार प्रकरणावर अजितदादांनीही आपलं मौन अद्याप सोडलं नाही. मात्र, मला कोणाशीही काही बोलायचे नाही, मला माझं काम करू द्या, अशा शब्दात अजित पवारांनी मीडियाशी बोलण्यास नकार दिला. सध्या अजित पवार आणि पार्थ पवार बारामतीत आहेत. त्यामुळे पार्थ पवार पुढे काय करणार? अशीच चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

शनिवारी पार्थ पवार यांनी काका श्रीनिवास पवार यांच्या निवासस्थानी जाऊन चर्चा केली. पुण्यातील ध्वजारोहन आटोपल्यानंतर अजित पवार बारामतीत पोहचले, रविवारी सकाळपासून अजित पवार बारामतीतील विकासकामांची पाहणी करत आहेत. नियोजित दौर्‍याप्रमाणे अजित पवार बारामतीतील स्थानिक नागरिकांना भेटत असतात. पार्थ प्रकरणावर अजित पवारांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारला होता. मात्र, अजित पवार यांनी याबाबत मौन बाळगले आहे.

- Advertisement -

श्रीनिवास पवार यांच्या घरी पार्थ पवार यांनी घडलेल्या प्रकरणावर चर्चा केली. रविवारी दिवसभरात अजित पवार आणि पार्थ पवार यांची चर्चा होऊ शकते. पार्थची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न काका श्रीनिवास पवार यांच्याकडून करण्यात आला आहे. तर पार्थची आत्या विजया पाटील यांनी पार्थ समजूतदार आहे, शरद पवारांना मी पहिल्यांदाच इतके चिडलेले पाहिलेले आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे पत्नीसह पुण्यासाठी रवाना झाले आहेत. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणावर पडदा पडणार का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

पार्थ पवारांची भूमिका राष्ट्रवादीशी विसंगत गेल्या काही दिवसांपासून राज्यात पार्थ पवार प्रकरण गाजत आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या निर्माणावेळी पार्थ पवारांनी जाहीरपणे समर्थन करत शुभेच्छा दिल्या होत्या. त्यानंतर बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत प्रकरणात पार्थ यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेऊन हे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे, अशी मागणी केली होती. मात्र, या दोन्ही मागण्या राष्ट्रवादीच्या भूमिकेशी विसंगत असल्याने पार्थ पवार यांना शरद पवारांनी जाहिरपणे फटकारले होते.शरद पवार काय म्हणाले होते? पार्थ पवार यांच्या मागणीवर शरद पवार यांनी कठोर भूमिका घेतली होती.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -