घरमहाराष्ट्रठाण्याच्या सभेला ये, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना...

ठाण्याच्या सभेला ये, तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो; राज ठाकरेंचा वसंत मोरेंना आदेश

Subscribe

राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी समाधानी आहे असं वसंत मोरे म्हणाले.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्यासंदर्भातील भूमिकेवरुन नाराज झालेल्या वसंत मोरेंनी आज सोमवारी राज ठाकरेंची शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीमध्ये राज ठाकरे यांनी वसंत मोरे यांना उद्याच्या ठाण्यातील उत्तर सभेला ये, तिथे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देतो, असं सांगितलं. राज ठाकरे यांच्यासोबत झालेल्या चर्चेनंतर वसंत मोरे यांनी माध्यमांशी संवाद साधताना नेमकी काय चर्चा झाली यासंदर्भात माहिती दिली.

वसंत मोरे म्हणाले, “राज ठाकरेंशी सगळं बोलणं झालं आहे. उद्याच्या ठाण्याच्या सभेला ये म्हणून बोलावलं. तुला सगळ्या प्रश्नांची ठाण्याला उत्तर मिळतील. उद्याच्या सभेनंतर राज ठाकरे सर्वांशी बोलणार आहेत.”

- Advertisement -

पुढे त्यांनी बोलताना राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर मी समाधानी आहे असं सांगितलं. अनेक वावड्या उठवल्या गेल्या. मी सुरुवातीपासून मनसैनिक असल्याचं सांगितलं. मनसेतच राहणार. उद्याची उत्तर सभा आहे त्यामध्ये राज ठाकरे सगळी उत्तरं देतील. त्यानंतर बाकीच्या गोष्टी राज ठाकरे पुण्यात येऊन बोलणार असल्याचं वसंत मोरे यांनी सांगितलं.

राज ठाकरे यांनी गुढीपाडव्याच्या मेळाव्यात मशिदींवरील भोंग्यांविरोधात घेतलेल्या भूमिकेमुळे अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाल्याचं समोर आलं होतं. मनसेचे पुणे शहराध्यक्ष वसंत मोरे यांनी माझ्या प्रभागात शांतता हवी असल्याने हनुमान चालीसा लावणार नसल्याचे म्हणत राज ठाकरेंचा आदेश धुडकावून लावला. यानंतर त्यांना पुणे शहराध्यक्षपदावरुन हटवण्यात आलं. या नंतर इतर राजकीय पक्षांनी वसंत मोरे यांना पक्षात येण्यासाठीच्या ऑफर दिल्या होत्या.

- Advertisement -

 

Girish Kamble
Girish Kamblehttps://www.mymahanagar.com/author/girishk/
गेल्या ३ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम. सामाजिक, राजकीय विषयांचा अभ्यास आणि लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -