घरमहाराष्ट्रकिरीट सोमय्या उद्या १ वाजता ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार

किरीट सोमय्या उद्या १ वाजता ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करणार

Subscribe

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनास मंजुरी दिली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे.

भाजपा नेते किरीट सोमय्या यांना आयएनएस विक्रांत आर्थिक अपहार प्रकरणात न्यायालयाकडून अटकपूर्व जामीनास मंजुरी दिली. त्यानंतर किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारवर टीका करण्यास सुरूवात केली आहे. तसंच, आता किरीट सोमय्या यांनी आपण ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा बाहेर काढणार असल्याचं जाहीर केलं आहे. नुकताच सोमय्या यांनी ट्वीट करत याबाबत माहिती दिली.

”उद्या 15 एप्रिल दुपारी 1 वाजता भाजप नरिमन पॉइंट ऑफिस मुंबईत ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा उघड करेन”, असं ट्वीट करत सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारला इशाला दिला आहे. त्यामुळं महाविकास आघाडी सरकारच्या कोणत्या नेत्याचा घोटाळा सोमय्या उघडकीस आणणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. गुरूवारी सकाळी झालेल्या पत्रकार परिषदेत किरीट सोमय्या यांनी विक्रीत घोटाळाप्रकरणी चौकशीदरम्यान नॉट रिचेबल असण्यामागचं कारण स्पष्ट केलं. त्याचवेळी त्यांनी ”उद्या शुक्रवारी नमुना पहायला मिळेल. महाराष्ट्राच्या जनतेला प्रॉमिस करतो की ठाकरे सरकारचा आणखी एक घोटाळा समोर ठेवणार आहे”, असं म्हटलं.

- Advertisement -

काय म्हणाले सोमय्या?

”ठाकरे सरकारच्या नेत्याचा घोटाळा बाहेर काढले तेव्हा तेव्हा माझ्यावर आरोप करण्यात आले. किरीट सोमय्यांनी ७५०० कोटी अमित शहांना दिले एकही कागद देण्यात आला नाही. पंतप्रधानांना मोठे पत्र लिहिले की चार ईडी ऑफिसर आणि किरीट सोमय्या घोटाळा करतात. त्यानंतर एसआयटीही नेमली आता दोन महिन्यांनंतरही काहीही झालेले नाही. वसईच्या कंपनीत ४५० कोटी वाधवान यांनी टाकले, पण हेदेखील सिद्ध करता आले नाही. पालघरच्या कंपनीत २६० कोटी ईडीने टाकले. राकेश वाधवान पार्टनर आहे, त्यामध्येही काहीही सिद्ध झाले नाही. जुहू १०० कोटी जमीन घोटाळा, पवईचा ४३५ कोटींचा पीएपी घोटाळा या प्रकारे ठाकरे सरकारने मांडले. हे एक डझन घोटाळ्याचे आरोप करताना दगड मारायचा आणि पुढे जायचे इतक सोप उद्धव ठाकरेंना वाटते का ? आता ५८ कोटींचा घोटाळ्याचा आरोप केल्यावर हिशोब द्यावाच लागेल. होम वर्कसाठी नॉट रिचेबल होतो. नॉट रिचेबल काही व्यक्तींसाठी होतो”

- Advertisement -

”संजय राऊत अडीच समन्सनंतर ईडी चौकशीला गेले होते. हे पहिल असे सरकार असेल ज्यामध्ये एक डझन नेत्यांच्या मालमत्ता या ईडीने जप्त केल्या आहेत. उद्धव ठाकरेंचा मेव्हणा श्रीधर पाटणकरची प्रॉपर्टी जप्त झाली. नवाब मलिक स्वतः जप्त झाले आणि प्रॉपर्टीही जप्त झाली. संजय राऊतांची प्रॉपर्टी जप्त झाली. अनिल देशमुख, प्रताप सरनाईक, भावना गवळी, आनंद अडसूळ, अजित पवार, यशवंत जाधव, हसन मुश्रीफ, अनिल परब, सुजित पाटकर, सदानंद कदम घोटाळेबाज सरकारचा यापेक्षा आणखी काय मोठा पुरावा हवा? माफीया सरकार आणि नेत्याची लूट समोर येत आहे आणि त्यावर कारवाई होत आहे. महाविकास आघाडी सरकारला भीती वाटणे तर स्वाभाविक आहे. जी नावे वाचली ते घोटाळे सिद्ध झाले असून कोर्टानेही मान्यता दिली. परमवीर सिंह यांच्याविरोधातील सगळ्या केसेसे सीबीआयकडे गेल्या आहेत. शरद पवार अनिल देशमुख यांच्यासाठी दहावेळा कोर्टात वरखाली गेले. पण घोटाळा होता म्हणूनच प्रॉपर्टी जप्त झाली”, असं किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत म्हटलं होतं.


हेही वाचा – बाबासाहेबांचा विरोध होता तर संविधानात ३७० कसं आलं?, जितेंद्र आव्हाडांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -