घरमनोरंजनअखेर रणबीर-आलिया अडकले विवाह बंधनात, पहिला फोटो समोर

अखेर रणबीर-आलिया अडकले विवाह बंधनात, पहिला फोटो समोर

Subscribe

वधू-वराच्या वेषात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एक परफेक्ट कपल दिसत होतं. त्यांच्या जोडीची जेवढी तारीफ कराल तेवढी थोडीच आहे. यापूर्वीही तुम्ही रणबीर आणि आलियाला सोबत पाहिलं असेल, परंतु अशा पेहरावात तुम्ही त्यांना पाहिलेलं नसेल.

गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेल्या अभिनेता रणबीर आणि आलिया यांचं अखेर लग्न झालंय. कपूर कुटुंबीयांत एका सुंदर चेहऱ्याची एंट्री झालीय. बॉलिवूडची अभिनेत्री आलिया भट्ट आता मिसेस रणबीर कपूर झाली आहे. 14 एप्रिलला म्हणजेच आज कुटुंबीयांच्या उपस्थितीत ‘वास्तू’मध्ये दोघे लग्नबेडीत अडकले आहेत. ते पती-पत्नी झाले असून, बॉलिवूडमधलं एक क्युट कपल आता विवाह बंधनात बंदिस्त झाले आहेत. विशेष म्हणजे त्यांचा पहिला फोटोही समोर आला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

वधू-वराच्या वेषात रणबीर कपूर आणि आलिया भट्ट एक परफेक्ट कपल दिसत होतं. त्यांच्या जोडीची जेवढी तारीफ कराल तेवढी थोडीच आहे. यापूर्वीही तुम्ही रणबीर आणि आलियाला सोबत पाहिलं असेल, परंतु अशा पेहरावात तुम्ही त्यांना पाहिलेलं नसेल. एवढं सुंदर जोडपं आजमितीस कोणीही पाहिलेलं नसेल. मागील कित्येक दिवसांपासून रणबीर-आलियाच्या लग्नाची चर्चा रंगली होती. कोरोना महामारीचा काळ असल्यामुळे त्यांनी गेल्या वर्षी लग्न केले नाही. पण अखेर रणबीर-आलियाच्या सप्तपदीचा क्षण आला असून, ते विवाह बंधनात अडकले आहेत.

- Advertisement -


आलियाने आपला ड्रीम मॅन रणबीर कपूरच्या नावाची मेहंदी काढली आहे. काल १३ एप्रिलला रणबीर आणि आलियाचा मेहंदीचा सोहळा झाला. यावेळी दोघांचे कुटुंबीय उपस्थित होते. तसेच यादरम्यान करिना कपूर आणि करिश्मा कपूर स्पॉट झाल्या. आजचा दिवस बी-टाऊनपासून ते सर्व चाहत्यांसाठी खूप खास राहिला आहे. कारण कपूर कुटुंबीय धूमधडक्यात आपल्या लाडका मुलगा रणबीरची वरात घेऊन आले. वास्तु आणि कृष्णा राज बंगल्यादरम्यान रणबीरची वरात निघाली होती. कृष्णा राज बंगल्यापासून रणबीरच्या वरातीला सुरुवात झाली असता ती वास्तूपर्यंत येऊन थांबली आहे, जिथे रणबीर आणि आलिया विवाह बंधनात अडकले आहेत.


हेही वाचाः सिने-महोत्सवांमध्ये २ पुरस्कार पटकावलेला ‘अन्य’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Vaibhav Desai
Vaibhav Desaihttps://www.mymahanagar.com/author/vaibhavr/
गेल्या 14 वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत; प्रिंट मीडिया चार वर्षे अनुभव, डिजिटल माध्यमाचा साडेनऊ वर्षांचा अनुभव आहे. तसेच अर्थकारण विषयावर लिखाणाची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -