घरमहाराष्ट्र"EVM आहे तर शक्य", संजय राऊत यांची BJPच्या घोषवाक्यावर टीका

“EVM आहे तर शक्य”, संजय राऊत यांची BJPच्या घोषवाक्यावर टीका

Subscribe

आज उद्धव ठाकरे हे आझाद मैदानात अंगवाडी सेविकांना संबोधित करणार आहे, अशी माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.

मुंबई : नवीन वाहन कायदे हे संसदेत विरोधी पक्षाला निलंबित करून चर्चा न करता कायदे मंजूर केले घेतले. तेव्हा जनतेचा असा उठाव होतो, अशी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर केली आहे. ईव्हीएम आहे तर शक्य आहे, अशी टीका संजय राऊत यांनी भाजपाच्या घोषवाक्यावर केली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज आझाद मैदाना अंगणवाडी सेविकांना संबोधित करणार, अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.

आगामी लोकसभेसाठी तिसरी बार मोदी सरकार अब की बार 400 के पार, असे घोषवाक्य घोषणा भाजापकडून देण्यात आली आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “होय, ईव्हीएम आहे ना, ईव्हीएम आहे तर शक्य आहे, असे घोषवाक्य असायला पाहिजे.

- Advertisement -

भाजपाच्या बैठकीत नेमके काय घडले?

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सर्वज राजकीय पक्ष कंबर कसून कामाला लागले आहे. देशात आधी लोकसभा निवडणूक आणि राज्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. सर्व राजकीय पक्षांनी निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काल (2 डिसेंबर) भाजपाच्या मुख्यालयात एक उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत भाजपाच्या प्रचाराची दिशा आणि घोषवाक्य ठरवण्यात आले आहे. “अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार” या घोषवाक्याच्या माध्यमातून लोकसभा निवडणुकीत भाजपा प्रचार करण्यात येणार आहे. नेहमीप्रमाणे यंदाही भाजपाने सोशल मीडियासोबतच घोषवाक्यावरही मोठा भर दिल्याचे पाहायला मिळत आहे. 2014 मध्ये भाजपाने विरोधकांना लक्ष्य करत “बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार” अशी घोषणा दिली होती. तर त्यानंतर 2019 मध्ये “फिर एक बार मोदी सरकार” या घोषवाक्याने मतदारांच्या मनावर राज्य केले होते. ज्यामुळे आता “अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार” असे घोषवाक्य राहणार असून या घोषवाक्यातच भाजपाची रणनीती असल्याचे पाहायला मिळत आहे.

हेही वाचा – “महानंद गुजरातला गेल्यास आम्ही शांत बसणार नाही”, Sanjay Raut यांचा सरकारला इशारा

- Advertisement -

सरकारकडून कोणतेही कायदे लादण्याचे काम

नवीन वाहन कायद्यातील हिट अँड रनच्या शिक्षेविरोधात ट्रक-टँकर चालक संपावर गेले आहे, या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “संपूर्ण देशात तणावाचे वातावरण आहे. ट्रक चालक रस्त्यावर उतरले आहेत. हिट अँड रन हे खूप गंभीर बाब आहे. मी हिट अँड रनचे समर्थन करत नाही. पण सरकारने ज्या पद्धतीने कायदा बनविला आहे. त्याविरोधात सर्वजण रस्त्यावर उतरले आहे. या कायद्यासंदर्भात चर्चा होणे गरजेचे आहे. जेसे काळ कृषी कायदे बनविले होते. तसेच आता नवीन वाहन कायदा बनविला आहे. सरकार कोणताही कायदा बनवते आणि लादते. या कायद्यासंदर्भात बोला आणि चर्चा तर करा.”

हेही वाचा – Loksabha 2024 : “अबकी बार…”, आगामी लोकसभेसाठी BJPची घोषणा ठरली

चर्चा न करता कायदे मंजूर

हिट अँड रनमध्ये सरकारला झुकावे लागले का? या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, “हे सर्व कायदे विरोधक संसदेत नसताना मंजूर करण्यात आले आहे. विरोधी पक्षाला निलंबित करून कायद्यांवर चर्चा न करता कायदे मंजूर केले जातात. त्यावेळी जनतेकडून असा उठाव होतो.

हेही वाचा – Babri Masjid : भाजपा नेते म्हणाले ‘दु:खद घटना’ अन् बाळासाहेब…, संजय राऊतांनी केला व्हिडीओ शेअर

उद्धव ठकरे अंगणवाडीच्या मोर्चाला संबोधित करणार

संजय राऊत म्हणाले, “आझाद मैदानात आज दुपारी अंगणवाडींचा मोठा मोर्चा आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून 1 लाखापेक्षा जास्त अंगणवाडी सेविका हे आज आझाद मैदानावर येत आहेत. गेल्या अनेक वर्षापासून अंगणवाडी शिक्षकांच्या ज्या मागण्यात आहेत. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना प्रयत्न केला होता. पण कोरोनामुळे त्यांना अंगणवाडीचे प्रश्न सोडविता आले नाही. अंगणवाडीच्या मोर्चेला ठाकरे गटाने पाठिंबा दिला असून आज दुपारी उद्धव ठाकरे संबोधित करणार आहेत.”

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -