घरताज्या घडामोडीशरद पवारांनी माझ ऐकल असत तर..; अजूनही वेळ गेली नाही, रामदास आठवलेंचा...

शरद पवारांनी माझ ऐकल असत तर..; अजूनही वेळ गेली नाही, रामदास आठवलेंचा सल्ला

Subscribe

नाशिक : मला पवार साहेबांबद्दल प्रचंड आदर आहे. मात्र, शरद पवार यांनी माझ ऐकले असते तसेच अजित पवार यांचे ऐकले असते तर आज ही वेळ आली नसती आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष फुटला नसता असे म्हणतानाच केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अजूनही वेळी गेलेली नाही असा सल्ला शरद पवार यांना दिला आहे.

रामदास आठवले पुढे म्हणाले, शरद पवार यांनी एनडीएला पाठिंबा दिला पाहिजे. विनाकारण कॉंग्रेस सोबत जाऊन तसेच इतर विरोध विरोधी पक्षांच्या सोबत जाऊन काही होणार नाहीये. येणाऱ्या काळात सत्ता बदल होणे अशक्य आहे तसेच नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान पदावरून बाजूला करणे ही सोप्पी बाब नाहीये. नरेंद्र मोदी यांचा पाया अतिशय मजबूत आहे. येणाऱ्या २०२४ साली होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आमचा विजय निश्चित आहे. विरोधकांनी कितीही कांगावा केला तरी जनता आमच्या पाठीशी आहे. आम्ही जनतेची कामे केलेली आहेत. त्यामुळे विरोधी पक्षांच्या इरादयांना सुरुंग लावून आम्ही २०२४ पुन्हा विजय संपादन करू.  राष्ट्रवादीत जरी फुट झाली असली तरी अजित पवार आता आमच्या सोबत आहेत आणि त्यांचा गट अधिक बळकट आहे. त्यांच्या येण्याने आमची ताकद अधिक वाढली आहे. असे बोलतांनाच, आता शरद पवारांनी या वयात इतके फिरणे योग्य नाही असा सल्लाही आठवले यांनी दिला आहे.

- Advertisement -

लोकसभेला २ तर विधानसभेला १० जागा 

सध्याच्या राजकीय परिस्थितीनुसार रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्ष हा भाजपाचा महाराष्ट्रातील सर्वात जुना सहकारी आहे. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाला भाजपकडून वाटाण्याच्या अक्षदा लावण्यात आल्या होत्या. मात्र, येऊ घातलेल्या निवडणुकीत रामदास आठवले यांनी लोकसभेला २ आणि विधानसभेसाठी १० जागांची मागणी भाजपकडे केली आहे. त्यात शिर्डी लोकसभा मतदारसंघात आठवले यांनी स्वतः उमेदवारी करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. सध्या या मतदार संघात शिंदे गटाचे खासदार आहेत. त्यामुळे जागावाटपात शिर्डीच्या जागेवरून भाजपाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.

समान नागरी कायदा व्हावा ही बाबसाहेबांची इच्छा 

येणाऱ्या काळात देशात समान नागरिक कायदा लागू होण्याची शक्यता आहे. केंद्रातील सत्ताधाऱ्यांकडून त्याबाबतचे संकेतही दिले जात आहेत. त्यामुळे या कायद्याबाबत विविध घटकातून वेगवेगळे मत व्यक्त होत आहेत. समान नागरी कायद्या बाबत बोलताना रामदास आठवले म्हणले, समान नागरी कायदा लागू व्हावा ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. देशात सर्व नागरिक समान असले पाहिजे. मात्र, विनाकारण गैरसमज आहे की मुस्लिम समाजाला आत्ताचा कायदा लागू नाही त्यामुळेच मुस्लिम समाजाची लोकसंख्या वाढते आहे यामताशीही मी सहमत नाही. तर दुसरीकडे समान नागरी कायदा हा मुस्लिमांच्या विरोधात आहे असा गैरसमज त्या समाजात आहे. तर तशीही परिस्थिती नाही. संविधान निर्मिती वेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची हा कायदा लागू करण्याची भूमिका होती त्यामुळे माझ्या व माझ्या पक्षाचाही या कायद्याला पाठिंबा असल्याचे मत यावेळी आठवले यांनी व्यक्त केले.

आठवलेंच्या कविता 

  • आमची जर कोणी काढली कळ, जर आमची कोणी काढली कळ, तर लक्षात ठेवा आमच्या सोबत आहेत छगन भुजबळ
  • जे म्हणत होते यांनी घेतले आहेत खोके, त्यांच त्यावेळेला फिरले होते डोके, यांच्याकडे आहे डोके म्हणून आम्ही देत नाही खोके
  • आमची चांगली झाली आहे शिक्षा, म्हणून आम्हाला करावी लागले प्रतीक्षा
  • बऱ्याच काळापूर्वी अजित दादांनी देवेंद्र फडणवीसांनी केला होता वादा, फार उशिरा आले आमच्यासोबत अजित दादा
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -