घरमहाराष्ट्र"श्री सदस्य जिवंत होणार असतील तर...", सुषमा अंधारेंनी हनुमान चालिसाबाबत केले वक्तव्य

“श्री सदस्य जिवंत होणार असतील तर…”, सुषमा अंधारेंनी हनुमान चालिसाबाबत केले वक्तव्य

Subscribe

अमरावती : “मी हनुमान चालिसा म्हटल्याने चेंगराचेंगरीत मृत्यू पावलेले श्रीसदस्य जिवंत होणार असतील तर दररोज सकाळ, दुपार आणि संध्याकाळी म्हणायला तयार आहे”, असे विधान ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारेंनी केले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे जाहीर केले होते. यानंतर शिवसैनिकांनी नवनीत राणांच्या मुंबईच्या मोर्चा खाडला होता. यानंतर राणा दाम्पत्यांना काही दिवसांसाठी तुरुंगासाची शिक्षा देखील झाली. यानंतर नुकतेच संसदेच्या पावसाळी अधिवेशनात खासदार श्रीकांत शिंदेंनी सभागृहात हनुमान चालिसा म्हणून दाखविली. यामुळे राज्यात हनुमान चालिसाचा मुद्दा हा केंद्रस्थानी राहिला आहे.

यानंतर सुषमा अंधारे यांनी भाजप आणि केंद्र सरकारला हनुमान चालिसाच्या मुद्यांवर टीका केली. सुषमा अंधारे म्हणाल्या, “हनुमान चालिसा म्हटल्याने देशातील किती प्रश्न सुटले?, श्री सदस्य जर जिवंत होणार असतील, तर मी दररोज सकाळ, दुपार आणि सायंकाळी हनुमान चालिसा म्हणायला तयार आहे. समृद्धी महामार्गावरील मृत्यू पावलेले 27 जीव परत येणार असतील, हनुमान चालिसा म्हटल्याने मणिपूरमध्ये ते रिव्हर्स करून ओके आणि दुरुस्त होत असेल, तर मी हनुमान चालिसेचे स्वागत करेन”, असे सवाल उपस्थित करत म्हणाले.

- Advertisement -

हेही वाचा – Sharad Pawar : लहान लोकांवर भाष्य करणार नाही; अजित पवारांवर निशाणा साधताना ‘त्या’ ऑफरवर केले भाष्य

“राज्यात मुस्लीम विरोधात बोलले की त्याला दहशतवादी ठरवणे. दलितांविरोधात बोललात की, त्यांना नक्षलवादी ठरवायचे आणि इतरांनी विरोधात बोलले की, त्यांना देशद्रोही ठरवायचे असे सर्व काम सुरू आहे”, असे म्हणत सुषमा अंधारेंनी राज्य सरकारवर अमरावतीच्या सभेत टीका केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -