घरताज्या घडामोडी'शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी ते मान्य', गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

‘शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी ते मान्य’, गुलाबराव पाटलांचे वक्तव्य

Subscribe

भाजपाच्या लोकसभा मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा युती असणार आहे. युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे.

भाजपाच्या लोकसभा मिशनच्या माध्यमातून बाळासाहेबांची शिवसेना आणि भाजपा युती असणार आहे. युतीचे नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील, त्यात शून्य जागा जरी आम्हाला लढवावी लागल्या तरी तो मान्य राहील, असे वक्तव्य राज्याचे पाणीपुरवठा मंत्री व शिंदे गटाचे आमदार गुलाबराव पाटील यांनी केले आहे. (if we get zero seats in the alliance we will accept it say gulabrao patal)

प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला. “भाजपाचे मिशन 145 आहे मात्र बाळासाहेबांची शिवसेना व भाजप आमची युती असणार आहेत. यात युतीचे नेत्यांनी जो निर्णय घेतला यात तो आम्हाला मान्य राहील. यामध्ये शून्य जागा जरी लढवायला लागल्या तो आम्हाला मान्य राहील फक्त शिंदे साहेबांनी आम्हाला आदेश करावे. भाजपच्या लोकसभा मिशनवरून संजय राऊतांनी आमच्यावर टीका केली होती. मात्र, संजय राऊत यांच्या म्हणण्याला मी भाव देत नाही. कुणीतरी मागच्या दरवाज्याने येणाऱ्या माणसाने हे म्हणावे आणि त्याला आपण मान्यता द्यावी. आपण एका जबाबदार व्यक्तीचे चिरंजीव असून असं करणं योग्य नाही आमदार संजय शिरसाट यांच्या मुलाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती व या क्लिप मधून एका व्यक्तीला धमकी दिल्याचा दावा करण्यात आला होता मात्र खरच त्यांनी असं केलं असेल तर त्यांची समज देवू” असे गुलाबराव पाटील यांनी म्हटले.

- Advertisement -

काही दिवसांपूर्वी राज्याचे कृषीमंत्री आणि बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे आमदार अब्दुल सत्तार यांनी आमच्याच पक्षातील नेत्याने माझ्याविरोधात कट रचल्याचे सांगितले होते. त्यावरूनही संजय राऊत यांनी टीका केली होती. त्यांच्या टीकेनंतर गुलाबराव पाटलांनी प्रत्युत्तर दिले. मागच्या सरकारमध्ये धुसफुस नव्हती का? असा प्रश्न उपस्थित करत गुलाबराव पाटील यांनी अडीच वर्षात काँग्रेस राष्ट्रवादी आणि आमच्यात धुसफुस होती म्हणून तर गुवाहाटीला गेलो, असे प्रत्युत्तर दिले.


हेही वाचा – ‘गँगवॉरमध्ये टोळी मारली जाते…’, संजय राऊतांचा गुलाबराव पाटलांवर हल्लाबोल

Vaibhav Patil
Vaibhav Patilhttps://www.mymahanagar.com/author/vaibhav-patil/
४ वर्षांपासून पत्रकारिता करत आहे. डिजिटल मीडियाचा अनुभव. ताज्या बातम्या आणि जनरल विषयांवर लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -