घरनवी मुंबईकांदा निर्यातीवरील अतिरिक्त शुल्काचा परिणाम; JNPT मधील कांदा सडण्यास सुरुवात

कांदा निर्यातीवरील अतिरिक्त शुल्काचा परिणाम; JNPT मधील कांदा सडण्यास सुरुवात

Subscribe

राज्यात सध्या सर्वसामान्यांना कांद्याचे दर रडवत असल्याची स्थिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

नवी मुंबई : टोमॅटोनंतर आता भाजीबाजारात कांद्याचा विषय चांगलाच गाजत आहे. दरम्यान केंद्राने कांदा निर्यातीवर 40 टक्के शुल्क लावल्याने कांदा निर्यात थांबली आहे. दरम्यान नवी मुंबईतील जवाहरलाल नेहरू पोर्ट (जेएनपीटी) बंदरात आलेला कांदा निर्याती अभावी सडत असल्याची स्थिती आहे. यावर सरकार आता काय निर्णय घेते याकडेही कांदा व्यापाऱ्यांचे लक्ष लागले आहे. (Impact of Additional Duty on Onion Exports; The onion in JNPT has started to rot)

राज्यात सध्या सर्वसामान्यांना कांद्याचे दर रडवत असल्याची स्थिती आहे. दरम्यान मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांमनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आहे तो कांदा खरेदी करण्यास परदेशातील व्यापारी वर्गाने कांदा घेण्यास नकार दिल्याने निर्यात ठप्प झाली आहे. त्यामुळे जेएनपीटीत आलेल्या शंभरहून अधिक कंटेनरमधील कांदा सडण्यास सुरूवात झाली आहे. काही व्यापाऱ्यानी स्थानिक बाजारपेठेत हा कांदा विकण्यास काढला असता कांदा सडत असल्याने त्यालाही ग्राहक मिळाले नसल्याचे चित्र दिसून आले.

- Advertisement -

या देशात होत असते कांद्याची निर्यात

भारतातील कांद्याची निर्यात ही मलेशिया, संयुक्त अरब अमिरातीसह आखाती देश, श्रीलंका आदी देशांमध्ये होत असते. मात्र निर्यात शुल्कात अचानकपणे वाढ केल्याने कांद्याच्या किंमतीत वाढ झाली आहे. अचानक वाढलेल्या दरावर काही व्यापाऱ्यांनी कांदा खरेदी करण्यास नकार दिला आहे.

हेही वाचा : येत्या गुरुवारी कांदा मार्केट राहणार बंद; निर्यातशुल्क वाढीचा निषेध

- Advertisement -

दोन हजार 500 कंटेनरची होते महिन्याला निर्यात

भारतातून आशियायी देशात महिन्याला साधारण 2500 हजार कंटेनरची निर्यात होत असते. मात्र आता केंद्र सरकारच्या तुघलकी निर्णयामुळे कांदा निर्यातीला मोठा फटका बसणार असल्याने व्यापाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा : कांदा निर्यात शुल्कवाढ प्रश्नी राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी, मुंडेंच्या आधी फडणवीसांची बाजी

कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे होणार नुकसान

केंद्राने कांद्याचा निर्यात शुल्कात 40 टक्क्यांहून अधिक वाढ केली आहे. यामुळे कांदा उत्पादक शेतकरी आणि व्यापारी आक्रमक झाले आहेत. सरकारच्या निर्णयामुळे कांद्याच्या निर्यातीमध्ये घट होणार आहे. यामुळे पुढच्या काळात किरकोळ बाजारात कांद्याचे दर कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्याचे मोठं नुकसान होणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -