घरठाणे१३ दिवसात ७६४ ठाणेकर झाले लसवंत, सर्वाधिक ६१७ बूस्टरधारक

१३ दिवसात ७६४ ठाणेकर झाले लसवंत, सर्वाधिक ६१७ बूस्टरधारक

Subscribe

 राज्यशासनाकडून कोविशिल्ड लस ठाणे महापालिकेला उपलब्ध झाल्यानंतर सुरू झालेल्या लसीकरणात ठाण्यात गेल्या १३ दिवसांमध्ये ठाणेकर नागरिकांकडून लस घेण्यासाठी ओढा दिसून आला. याच कालावधीत तब्बल ७६४ ठाणेकर लसवंत झाले असून.त्यामध्ये प्रामुख्याने बूस्टर लस घेण्याची संख्या सर्वाधिक म्हणजे ६१७ इतकी असल्याची माहिती महापालिका सूत्रांनी दिली आहे.

राज्यशासनाकडून ठामपास सहा हजार कोविशिल्ड लसीचा साठा उपलब्ध झाल्यावर समान प्रमाणात त्या लसीचे वाटप झाल्यावर महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय, पार्किंग प्लाझा, किसन नगर आरोग्य केंद्र, मानपाडा आरोग्य केंद्र शिळ आरोग्य केंद्र, सी आर, वाडिया आरोग्य केंद्र, लोकमान्य कोरस आरोग्य,  केंद्र रोझा गार्डनिया  आरोग्य केंद्र, ठाणे महापालिका कौसा रुग्णालय या ठिकाणी कोविशिल्ड लस १८ वर्षावरील ज्या नागरिकांचा कोविशिल्ड लसीचा पहिला, दुसरा व बुस्टर डोस घेतला नव्हता त्यासाठी हे लसीकरण  सुरू झाले आहे. याच १३ दिवसात म्हणजे १८ ते ३० जानेवारी दरम्यान, ठाणे शहरातील ६७४ नागरिकांनी लस घेतली आहे. यामध्ये पहिला डोस घेणाऱ्या ४५ नागरिकांप्रमाणे दुसरा डोस घेणे १०३ असून बूस्टर घेणाऱ्यांची संख्या ६१७ इतकी असल्याचे ठामपा आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -